Pune News : खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन

खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या पाठोपाठ आता खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पुणे : खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या पाठोपाठ आता खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणे, या व अशा विविध प्रकरणी आलेल्या तक्रारींवरून राज्य शासनाकडून बेडसे यांच्यावर गुरुवारी (ता. ११) कारवाई करण्यात आली.

निलंबनाबरोबरच बेडसे यांची विभागीय चौकशीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत बेडसे यांचे मुख्यालय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय राहणार असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे महसूल विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी आदेशात म्हटले आहे.

निलंबन कालावधीत बेडसे यांनी खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा अथवा व्यापार करू नये. तसे केल्यास निर्वाह भत्ता मिळणार नसल्याचे शासनाने म्हटले आहे. बेडसे हे मोहोळ व खेड येथे कार्यरत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, सर्वसामान्य नागरिक व वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे, या कारणास्तव बेडसे यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.