30 तासांनंतरही कंपनीत धुराचे लोट; नातेवाइकांनी फोडला टाहो

30 तासांनंतरही कंपनीत धुराचे लोट; नातेवाइकांनी फोडला टाहो
SYSTEM
Updated on

पिरंगुट : उरवडे (ता. मुळशी) येथील कंपनीतील आगीच्या दुर्घटनेनंतर कंपनीच्या इमारतीला अवकळा आली असून, आतील भागाचेही संपूर्ण नुकसान झालेले आहे. सर्वत्र भग्न झालेले लोखंडी साहित्य, कोळसा झालेली अन्य रसायने व वस्तूंमुळे दुरवस्था झाली आहे. आग लागून सुमारे तीस तास उलटूनही एका खोलीत धुराचे लोट बाहेर पडत होते. अग्निशमन दल व मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने घटनास्थळी ठाण मांडले असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. (svs aqua technologies fire victims family mourning

नातेवाइकांनी फोडला टाहो

पिरंगुट उरवडे (ता. मुळशी) येथील कंपनीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी नातेवाइकांनी अक्षरशः टाहो फोडला. या दुर्घटनेत कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची मुलगी; तर कुणाची पत्नी गेली आहे. सतरापैकी पंधरा महिलांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. लहान लहान मुले असलेल्या माता, एकटीच्या जिवावर प्रपंच चालवणाऱ्या कमावत्या महिला या दुर्घटनेत गमावल्याचे दुःख कुटुंबीयांना अनावर झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबीयांची शोकाकूल अवस्था हृदयद्रावक अशीच आहे. वळसे पाटील, सुळे आणि थोपटे यांनी उरवडे येथील कांजणेवस्तीत राहणाऱ्या मयत गीता दिवाडकर यांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. गीता यांच्या नातेवाइकांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर अश्रूंना वाट करून दिली. ताईंनी त्यांना धीर देऊन मदतीबाबत चर्चा केली.

कामगारांच्या जीवावर घाला

मुळशीतील सॅनिटायझर कंपनीला आग लागून कित्येक कामगार हकनाक जीवाला मुकले. ही दुर्घटना टाळता आली असती. आगप्रतिबंधक साधनांची पुरेशी उपलब्धता असती तर हे झाले नसते. आता ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्यांची कसून तपासणी करणं गरजेचं आहे. अल्कोहोल अतिशय ज्वलनशील आहे, त्यामुळे त्याची हाताळणी खूप काळजीपूर्वक करावी लागते. अग्निप्रतिबंधक कपडे घालून कामे करावी लागतात. अलीकडच्या अनेक दुर्घटनांत अशी काळजी घेतली नव्हती, असे समोर आले आहे. कामगार विमा शंभर टक्के उतरवला होता का, अग्निशमन विभागाने परवानगी दिली होती का, कंपनी रजिस्टारने कंपनीची तपासणी करून सरकारला कळवले होते का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानग्या घेतल्या होत्या का, कामगारांना कामातील धोके सांगितले होते का, धोका निर्माण झाला तर काय उपाययोजना करता येईल, याचे प्रशिक्षण दिले होते का, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत.

- डॉ. शिवाजी गायकवाड, राजगुरूनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.