स्वारगेट- कात्रज मेट्रोचा प्रस्ताव पुढे ढकलला

स्वारगेट ते काजत्र मेट्रोच्या वाढीच ७३३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आला.
Pune Metro
Pune MetroSakal
Updated on

पुणे - स्वारगेट (Swargate) ते काजत्र मेट्रोच्या (Katraj Metro) वाढीच ७३३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव (Proposal) सर्वसाधारण सभेत आला. पण याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी मेट्रोचे अधिकारी उपस्थित नसल्याने हा विषय आठ दिवस पुढे ढकलला आहे. (Swargate to Katraj Metro Proposal Forward)

पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज यामार्गावर भुयारी मेट्रो प्रस्तावित केला आहे, पण या कामासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने त्यांच्या वाट्याच्या १५ टक्के निधीत कपात केली आहे. त्यामुळे हा खर्चाचा भार महापालिकेला उचलावा लागणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीमध्ये मान्यता मिळाली असून, तो आज मुख्यसभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल तांबे यांनी याप्रकल्पाची सविस्तर माहिती हवी अशी मागणी केली. मात्र, यावेळी मेट्रोचे अधिकारी सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे माहिती मिळू शकली नाहीत.

दरम्यान, नगरसेवक बाळा ओसवाल यांनी या प्रकल्पास आधीच उशीर झाला आहे, त्यामुळे आणखी उशीर कशाला करता, मान्यता द्या अशी भूमीका मांडली, पण त्यावर एकमत झाले नसल्याने २८ जूनपर्यंत विषय पुढे ढकलण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()