Swayam Talks: महाराष्ट्राची नवी 'सकाळ' 'स्वयं टॉक्स' सोबत ! तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी चळवळ आता महाराष्ट्राच्या ११ शहरांत!

ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत वर उल्लेखिलेल्या महाराष्ट्रातील ११ शहरांमध्ये हा उपक्रम 'सकाळ' समूहाच्या सहकार्याने होणार आहे.
Swayam Talks
Swayam TalksEsakal
Updated on

चाकोरीबाहेर विचार करणाऱ्यांना योग्य दिशा मिळावी आणि वेगळा विचार करुन यशस्वी झालेल्यांकडून प्रेरणा घेता यावी, म्हणून 'स्वयं टॉक्स' निरनिराळ्या क्षेत्रांतील भन्नाट माणसांना महाराष्ट्रातल्या ११ शहरांत घेऊन येणार आहे! हे सकारात्मक विचार तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे भक्कम सहकार्य लाभणार आहे. 

सकाळ समूहातर्फे वेळोवेळी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. सदर उपक्रमदेखील त्यापैकीच एक आहे. २०१४ पासून 'स्वयं टॉक्स' वर विविध क्षेत्रात अफलातून काम करण्याऱ्या लोकांनी आजवर आपल्या कल्पना, प्रयोग आणि प्रवास जगासमोर मांडले आहेत व ते सर्व व्हिडीओ Swayam Talks या यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

सियाचिन येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरु करणाऱ्या सुमेधा चिथडे, सुपर मॉम्सना एकत्र करून करोडो रुपयांचा कॉटन डायपर्सचा व्यवसाय उभी करणारी पल्लवी उटगी, दिव्यांग मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद्र महाजन, एक एकर शेतीच्या मॉडलमधून लाखो शेतकऱ्यांना जोडणारे ज्ञानेश्वर बोडके, जगातील सर्वात मोठे मराठी रेस्टॉरंट काढणाऱ्या जयंती कठाळे, हात नसलेल्यांना देशी बनावटीचा रोबोटिक हात देणारा प्रशांत गाडे, मुंग्यांचा अभ्यास करणारी नूतन कर्णिक, पन्नाशीनंतर अंटार्टिकाला गेलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर, हत्तींशी गप्पा मारणारा आनंद शिंदे यांच्यासारख्या सुमारे दीडशे मान्यवरांनी स्वयं च्या व्यासपीठावर आजवर हजेरी लावली आहे. 

Swayam Talks
Swayam TalksEsakal

‘महाराष्ट्राची नवी सकाळ’ या उपक्रमाच्या अंतर्गत सादर होणारे ११ कार्यक्रम जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बारामती, सातारा, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर व मुंबई अशा अकरा शहरांमध्ये होणार आहेत. उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, कला अशा विविध माध्यमांत काम करणाऱ्या मंडळींनी लोकांशी संवाद साधावा व यामुळे लोकांच्या उत्सुकतेचे रुपांतर त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक उत्कर्षात व्हावे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत वर उल्लेखिलेल्या महाराष्ट्रातील ११ शहरांमध्ये हा उपक्रम 'सकाळ' समूहाच्या सहकार्याने होणार आहे. त्याचे अपडेट्स वेळोवेळी वाचकांपर्यंत पोहोचवले जातील. निरनिराळ्या क्षेत्रांतील महाराष्ट्रातील महत्त्वाचे ब्रँड्स देखील या संपूर्ण उपक्रमाच्या मागे भक्कमपणे उभे असणार आहेत. स्वयं टॉक्स'साठी जमलेल्या प्रेक्षकांमध्ये विविध क्षेत्रातील विद्यार्थी, उद्योगपती, व्यावसायिक, कलाकार, बुद्धिवंत अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा समावेश असतो! या कार्यक्रमात आल्यावर अशा अनेक मान्यवरांना भेटण्याची संधीदेखील मिळू शकते. ज्यांना नवीन काही ऐकण्याची, शिकण्याची आणि करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावायला हवी. अधिक माहितीसाठीwww.swayamtalks.org या वेबसाईटला भेट द्यावी.  

३१ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजीनगर येथील ‘स्वयं टॉक्स’ची नोंदणी tikitalay.com वर उपलब्ध. 

त्वरित नोंदणी करण्यासाठी हा QR कोड scan करा.

Swayam Talks QR Code
Swayam Talks QR CodeEsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.