तळेगाव स्टेशन : रस्त्यावर अवजड वाहने बंद पडल्याने तळेगाव-चाकण महामार्गावर मंगळवारपासून तीन दिवस अभूतपूर्व वाहतुक कोंडी झाली होती. कोकणातील आळंदी यात्रेकरुंसह तळेगाव,चाकण एमआयडीसीतील कामगारांचे दळणवळण वाहतुक कोंडीमुळे विस्कळीत झाले. मंगळवारी (ता.३०) पहाटे खालुंबरेजवळ अवजड वाहन रस्त्यावर बंद पडल्यामुळे सकाळपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवासाठी आळंदीला जाणा-या कोकणातील भाविकांच्या वाहनांच्या वाढीस ओघामुळे कोंडीत आणखी भर पडली.बुधवारी सकाळपासून चालू असलेली पावसाची रिपरिप आणि पुन्हा वाहने बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.बुधवारी (ता.०१) रात्री तळवडे आयटी पार्क परिसरात झालेली कोंडी वाढत जाऊन थेट चाकण एमआयडीसीपर्यत पोहोचली.अचानक वाढलेल्या पावसामुळे रस्त्याकडेच्या डबक्यात पाणी साचल्यामुळे काही वाहने फसली.
बेशिस्त वाहनचालकांनी दुहेरी रांगा करत उलट्या दिशेने वाहने घुसवल्याने वाहतुक सुरळीत होण्यास गुरुवारी दुपार झाली.तब्बल २४ तासांहून अधिक काळ कोंडी कायम राहील.तळेगाव-चाकण चाकण महामार्गावर अरुंद रस्ता,अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे कायम जनजीवन विस्कळीत होते.रोज इंधन आणि वेळेचा चुराडा होतो.राष्ट्रीय महामार्ग घोषित होऊनही अद्याप कामास सुरुवात न झाल्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांसह एमआयडीसीतील कामगार वर्गात रोषाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.