घुंगरू तुटले रे...पोटासाठी नाचणाऱ्यांच्या नशिबी उपासमार... 

tamashaa
tamashaa
Updated on

यवत (पुणे) : लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. या कलेवर पोट भरणाऱ्या राज्यातील सुमारे सतरा ते अठरा हजार कलावंत सध्या उपासमारीचा सामना करत आहेत. सरकार आमच्यासाठी काहीतरी करेल, या आशेवर सध्या बहुतांश कलावंत आहेत. "सध्या सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, मायबाप सरकारने आमचाही विचार करावा,' अशी आशा ते करत आहेत. 

राज्यात सुमारे 70 कला केंद्र आहेत. यामध्ये सुमारे सहा ते सात हजार कलावंत काम करतात. त्यात नर्तक, वादक, गायक, संयोजक यांचा समावेश होतो. त्यांचे रसिकांकडून मिळणाऱ्या पैशांवर पोट अवलंबून असते. मात्र, मागील दोन अडीच महिन्यांपासून कला केंद्र बंद आहेत. कमी शिक्षण, इतर कामांचा अनुभव नाही, समाजाचा पाहण्याकडे नकारात्मक दृष्टिकोन, या कारणांमुळे त्यांना इतर ठिकाणी काम मिळणेही कठीण होऊन बसले आहे. सध्या सरकारकडून व विविध संस्था, देणगीदार यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हे लोक आपापल्या गावी कसाबसा तग धरून आहेत. 

तमाशा फडांची अवस्थाही काही वेगळी नाही. राज्यात तेरा मोठे तमाशा फड आहेत. लहानसहान सुमारे दीडशे फड आहेत. या फडांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांची संख्या सुमारे साडेदहा ते अकरा हजार आहे. या फडांच्या चलतीच्या काळात देशात लॉकडाउन झाले. यात्रांच्या या काळात कार्यक्रम बंद झाल्याने त्यांचे उत्पन्न बुडाले. या तीन- चार महिन्यांच्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नावर हे लोक वर्षभर गुजराण करत असतात. या कलावंतांची अवस्थाही आता बिकट झालेली आहे. या सर्वांनाच आता सरकारकडून काही तरी आधार मिळावा, असे वाटत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव (चौफुला, ता. दौंड) म्हणाले, ""आमच्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे एका सामाजिक संस्थेकडून अनेक कलावंतांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, कलावंतांची संख्या मोठी आहे. पवारसाहेब, खासदार डॉ. अमोल कोल्हेसाहेब कलावंतांसाठी सहानुभूतीने विचार करत आहेत. त्यामुळे शासन दरबारी कलावंतांचा विचार होईल, अशी खात्री वाटते.'' 

आम्ही सरकारकडे अनेकदा निवेदन केले आहे. मदतीची मागणी केली आहे. खासदार अमोल कोल्हे याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही मदत करण्याचे मान्य केले आहे. कोल्हेसाहेबांनी आमची कैफियत केंद्र आणि राज्य सरकारकडे मांडलेली आहे. त्यांचे मी सर्व कलावंतांच्या वतीने आभार मानतो. सरकार नक्कीच काहीतरी करेल, अशी आशा व्यक्त करतो. 
- रघुवीर खेडकर- संगमनेर
तमाशा फड मालक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.