अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

तनिषाने आता बारावीच्या परीक्षेतही (12th Exam Result) शंभर टक्के गुण मिळवीत डाव जिंकला आहे.
Tanisha Boramanikar from Chhatrapati Sambhajinagar
Tanisha Boramanikar from Chhatrapati Sambhajinagaresakal
Updated on
Summary

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

पुणे : वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने आता बारावीच्या परीक्षेतही (12th Exam Result) शंभर टक्के गुण मिळवीत डाव जिंकला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तनिषा बोरामणीकर (Tanisha Boramanikar) हिला बारावीच्या परीक्षेत एकूण ६०० गुणांपैकी ५८२ गुण मिळाले असून तिला १८ क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले आहेत.

Tanisha Boramanikar from Chhatrapati Sambhajinagar
Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळविणारी तनिषा ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. खरंतर तनिषा ही राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ पटू आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील ही विद्यार्थिनी आहे.

तिला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, पाली आणि अर्थशास्त्र विषयात शंभरपैकी शंभर गुण आहेत. तर इंग्रजी विषयात ८९ गुण, बुक कीपिंग ॲण्ड अकाउंटन्सी विषयात ९५ गुण तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस विषयात ९८ गुण आहेत. तनिषा ही बुद्धीबळ खेळाडू असून तिने सात वर्षाखालील, नऊ वर्षाखालील, ११ वर्षाखालील वयोगटासाठी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विविध पदके मिळविली आहेत.

Tanisha Boramanikar from Chhatrapati Sambhajinagar
Pune 12th Results : बारावी निकालात पुणे विभागीय मंडळ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर; दोन लाख 29 हजार विद्यार्थी झाले उत्तीर्ण

ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. १६ वर्षाखालील वयोगटासाठी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सब ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत तिने ‘नॅशनल चॅम्पियन’चा मान मिळविला आहे. बुद्धिबळाच्या खेळात कामगिरी करणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी केली आहे.

तनिषाचे वडील सागर म्हणाले, ‘‘वयाच्या सहाव्या वर्षापासून तनिषा बुद्धीबळ खेळत आहे. लहानपणापासूनच तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अकरावीत असतानाही ती राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. बारावीत असतानाही तिने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.’’

Tanisha Boramanikar from Chhatrapati Sambhajinagar
मोलमजुरी करणाऱ्यांची मुलगी बारावी परीक्षेत तालुक्यात अव्वल; 'इतके' टक्के गुण मिळवून प्रणालीने हलाखीच्या परिस्थितीवर केली मात

तनिषा सध्या सनदी लेखापाल होण्यासाठी तयारी करत आहे. तिला सनदी लेखापाल व्हायचे आहे. याशिवाय ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची देखील तयारी करणार आहे. तसेच बुद्धीबळ खेळातही तिला आणखी मोठी उंची गाठायची असल्याचे सागर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.