Pune Accident News: पुणे-नगर मार्गावर टँकर पलटी; मोठ्या प्रमाणावर वायुगळती, दोन तास रस्ता राहणार बंद

अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाली आहे.
Pune Accident News
Pune Accident NewsEsakal
Updated on

नगर रस्त्यावर वडगाव शेरी फाटा येथे ज्वलनशील वायू घेऊन जाणारा मोठा टँकर पलटी झाला असून या अपघातामुळे टँकर मधून गॅस गळती सुरू झाली आहे. वायु स्फोटक असल्यामुळे आणि आग लागण्याची शक्यता असल्यामुळे विमानतळ वाहतूक पोलिसांनी मध्यरात्रीपासून वाहतूक बंद केली असून ती नगर रस्त्याच्या एका बाजूने वळवली आहे. (Latest Marathi News)

सुरक्षेचा प्राथमिक उपाय म्हणून वायुगळती होत असलेल्या टँकरवर सुमारे दहा अग्निशामक दलाच्या गाड्यांतून पाण्याचे फवारे मारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. टँकर मधून सुरू असलेली वायू गळती थांबवण्याकरता सदर कंपनीचे सुरक्षा पथक उपाययोजना करण्यासाठी मुंबईवरून निघाले असून ते येथे दीड ते दोन तासात पोहोचेल असा अंदाज असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Marathi Tajya Batmya)

Pune Accident News
राज्यात ४००वर टॅंकर सुरु! उजनीसह भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा, जाणून घ्या; जानेवारीनंतर ५ महिने तीव्र टंचाई

तोपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि हवेमध्ये वायू मिसळू नये याकरता सतत टँकरवर पाण्याचे फवारे मारण्याचे काम सुरू आहे. टँकरवर सतत पाणी मारावे लागत असल्यामुळे वडगाव शेरी पंपिंग स्टेशन शेजारील दोन पंचतारांकित हॉटेलच्या पाण्याच्या टाक्यांमधून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

विमानतळ वाहतूक पोलीस निरीक्षक मनोहर इडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा टँकर नगरच्या दिशेने इथलीन ऑक्साईड हा ज्वलनशील वायू घेऊन जात होता. वडगाव शेरी फाट्यावरील ईबीज हॉटेल समोरील दुभाजकाला धडकून तो पलटी झाला. टँकर चालकाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले असावे असा अंदाज आहे. टँकर चालकाला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.(Latest Pune News)

Pune Accident News
७ वर्षांत शेतकऱ्यांना एकदाही १०० टक्के कर्जवाटप नाही! बॅंकांकडून फक्त कर्जाचे नवे-जुनेच; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकांनंतरही अशीच स्थिती

या टँकर मधील वायू दुसऱ्या टँकर मध्ये भरण्याकरता लागणारी रिलायन्स कंपनीची विशेष यंत्रणा मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघाली आहे. ती दीड तासात पुण्यात पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर या टँकर मधील वायू दुसऱ्या टँकर मध्ये भरला जाईल. त्यासाठी आणखी तीन लागू शकतात.

विमानतळ वाहतूक पोलीस, विमाननगर आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियोजन सुरू केले आहे. नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक वडगाव शेरी फाट्यावर थांबवण्यात आली आहे. पुण्याच्या दिशेने जाताना विमाननगर चौक ते वडगाव शेरी फाट्यापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Pune Accident News
Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.