शिवरी येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी
खळद : शिवरी (ता.पुरंदर) येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पंधरावा वित्त आयोग यमाई माता ट्रस्ट यांच्या विषयांच्या सोबतच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवडीचाही विषय अजंठ्यावरती घेण्यात आला होता. यानुसार येथे अध्यक्ष पदासाठी मधुकर गोपाळ कामथे व नवनाथ सदाशिव गायकवाड यांनी इच्छा व्यक्त केली. यामध्ये दोघांच्यातही एकमत न झाल्याने येथे मतदान प्रक्रियेद्वारे अध्यक्ष पदाची निवड करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये जाहीर करण्यात आला व तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली.
यामध्ये दुपारी ०१ ते ०४ या काळामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी ०३ वाजेपर्यंत तीनशे पेक्षा अधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. साधारण पदे चारशे ते पाचशे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी परिस्थिती येथे पाहावयास मिळत आहे. सायंकाळी ०४ ते ०५ या दरम्यान मतमोजणी होऊन ०५ वा. प्रत्यक्षात अध्यक्ष निवड जाहीर करण्यात येणार असल्याचे ग्रामसेविका शितल भुजबळ यांनी सांगितले. यावेळी तलाठी प्रकाश राठोड,संगणक ऑपरेटर रूपाली कामथे ,पोलीस हवालदार तात्यासाहेब खाडे, ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम कांबळे, पोलीस पाटील नवनाथ लिंबोरे यांनी या कामी मदत केली.
शिवरी गावामध्ये निवडणूक म्हटलं की मोठी चढाओढ तयार होत असे असा गावचा इतिहास असताना याला अपवाद २०२०/२१ या कालावधीमध्ये झालेली ग्रामपंचायत निवडणूक ठरली. यावेळी या गावाने बिनविरोध निवडणुक करत तालुक्यामध्ये मोठा नावलौकिक कमावला होता. मात्र ही एकी दीर्घकाळ टिकली नाही नुकतीच काही महिन्यांपूर्वी झालेली सोसायटीची निवडणूक येथे दोन गटांमध्ये पार पडली तेव्हापासून येथे या पुढील कोणतीही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले व याच्यातूनच आता तंटामुक्त समितीची अध्यक्ष पदाचीही निवडणूक गावामध्ये पार पडत आहे. या निवडणूकीसाठी नागरिक मोठ्या उत्साहाने मतदाराला घराच्या बाहेर पडताना पाहावयास मिळत आहे तर सर्व सामान्य नागरिक याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
"या गावचे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच बबनराव कामथे यांनी गावामध्ये तंटामुक्त समितीची निवडणूक ही तंटा करून होणे योग्य नाही,हे गावाला शोभतही नाही, वास्तविक ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. यासाठी उमेदवार ही तयार झाले होते मात्र काही कारणास्तव गावाला निवडणुकीला सामोरे जावे लागले असलेल्याचे सांगितले. तर
" गावामध्ये दोन जणांचे अर्ज आल्यानंतर चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता मात्र यापदाचे गांभीर्य कोणालाही नसून पदाला न्याय देण्याची भूमिका नाही, परिपक्व विचाराची माणसे या पदावर येणे गरजेचे आहे मात्र पदापेक्षा इच्छाशक्ती मोठी होत असून गाव अधोगतीच्या दिशेने जात असल्याचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ कामथे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.