कोरोनानंतरच्या बुरशीसाठी हवी ‘टास्क फोर्स’; म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ

कोरोनानंतरच्या बुरशीसाठी हवी ‘टास्क फोर्स’; म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ
Updated on

पुणे : ‘म्युकरमायकॉसीस’ या बुरशीजन्य आजाराचे रूग्ण पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आढळून येत आहे. या दुर्मिळ आजाराबद्दल रूग्ण आणि डॉक्टरांमध्ये माहितीचा अभाव दिसतो. अत्यंत गुंतागुंतीच्या या आजारावरील उपचार हे वेळखाऊ आणि महागडे आहेत. त्यामुळे प्रशासन, डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील समन्वयासाठी ‘टास्क फोर्स’ची आवश्यकता आहे, अशी मागणी तज्ज्ञांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या सहव्याधी आणि रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी असलेल्या रूग्णांना ‘म्युकरमायकॉसीस’ हा बुरशीजन्य आजार होऊ शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही रूग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे या आजाराबद्दलची अजूनही नवनवीन तथ्ये समोर येत आहे. एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे मुखशल्य चिकित्सक विभागप्रमुख डॉ. जे. बी. गार्डे म्हणाले,‘‘या आजाराची तीव्रता पाहता, कोरोना दरम्यानची उपचारपद्धती आणि म्युकरमायकॉसीस वरील उपचार, यासाठी एक आदर्श कार्यप्रणाली विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या डॉक्टरांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याद्वारे म्युकर समन्वय आणि उपचार केंद्र स्थापन करायला हवे.’’ कोरोनानंतर दीर्घकाळापर्यंत अशा आजारांवर लक्ष द्यावे लागणार आहे.

कोरोनानंतरच्या बुरशीसाठी हवी ‘टास्क फोर्स’; म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ
लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्या : विजय शिवतारे

‘टास्क फोर्स’ची आवश्यकता का?

  • - म्युकरमायकॉसीसमधून बरे होण्यासाठी तातडीचे निदान आवश्यक

  • - त्यासाठी रूग्ण आणि डॉक्टरांमध्ये योग्य जनजागृतीची गरज

  • - ही रूग्णसंख्या कोरोनानंतरही दीर्घकाळपर्यंत राहणार

  • - या आजारातील मृत्यूदर ५४ टक्के, तसेच शारिरिक अपंगत्व येऊ शकते

  • - कोरोनाच्या उपचाराशी जवळचा संबंध, त्यामुळे सर्व प्रकारच्या डॉक्टरांमध्ये समन्वय आवश्यक

  • - यासाठी महागडी इंजेक्शने, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा आवश्यक

  • - अँटी फंगल इंजेक्शन पुरवठा, किंमती सुरळीत राहण्याची गरज

  • - उपचारांची क्लिष्टता, शस्त्रक्रिया आणि महागडे उपचारामध्ये सर्वसामान्य व्यक्ती भरडली जाणार

‘म्यूकरमायकॉसीस’पासून बचावासाठी काय कराल?

  • - कोरोनातून बरे झाल्यानंतरही घरातही मास्क वापराच

  • - कोरोनातून बरे झाल्यावर डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्सरे काढा

  • - घरातील बुरशीवाढते अशी ठिकाणे आणि धुळीपासून दूर रहा

  • - रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या

  • - डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी फंगल औषधे घ्या

  • - वेळोवेळी संबंधीत डॉक्टरांना भेटा

कोरोनानंतरच्या बुरशीसाठी हवी ‘टास्क फोर्स’; म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ
जुन्नरमध्ये केबल चोरीचे सत्र सुरूच

कोरोना रुग्णांन म्युकरमायकॉसिसपासून वाचविण्यासाठी फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, दंत चिकिस्तालय, मुखशल्य चिकित्सक, नाक-कान-घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान, उपचार, पुनर्वसन या तिन्ही टप्प्यावर रुग्णाचे प्राण वाचविणे गरजेचे आहे.

- डॉ.जे.बी.गार्डे, दंतशल्य चिकित्सक, एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय.

कोरोनाच्या उपचारादरम्यान काही रुग्णांसाठी स्टिरॉइडचा वापर करणे आवश्यकच आहे. पण काही ठिकाणी याचा अति वापर होतो. तसेच काही रुग्णही गृह विलगीकरणात असतानाही स्टेरॉईड घेतात. रुग्णांनी योग्य त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात स्टेरॉईड घेणे गरजेचे आहे. लोकांनी मास्क वापरला तर मोठ्या प्रमाणात हे संकट टाळता येईल.

- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक (आरोग्य) पुणे विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.