दिवे घाटात टेम्पोच्या डिझेल टाकीला आग

राहुल शेवाळे यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
tempo
temposakal
Updated on

उंड्री-पिसोळी ः दिवे घाटामध्ये टेम्पोच्या डिझेल टाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी तातडीने टेम्पो थांबविला. कारमधून पाण्याच्या बाटल्यांनी आग विझविली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवारी (दि. २२ सप्टेंबर) घडली.

शेवाळे म्हणाले की, टेम्पो दिवे घाटातून पुण्याकडे चालला होता. त्यावेळी आम्ही पाठीमागे होतो, टेम्पोच्या डिझेल टाकीला आग लागल्याचे निदर्शनास येताच कार जोरात घेऊन टेम्पो थांबविला. दरम्यान, दुचाकीवरील मंडळींनाही थांबविले. टेम्पोमध्ये शेतीसाठी लागणारी लाखो रुपयांची खते आणि औषधे होती. दरम्यान, टेम्पोचालकाने राहुल शेवाळे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.