Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात दहा कोंबड्या, एक शेळी आणि चार करडे ठार

बोऱ्हाडे परिवाराचे मोठे नुकसान झाले
बिबट्या
बिबट्याesakal
Updated on

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील बोऱ्हाडेमळा परिसरात आज शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळ्यांची चार करडे व १० कोंबड्या फस्त करून एक शेळी ठार केली आहे. येथील सुनील तुकाराम बोऱ्हाडे यांच्या घरासमोरील गोठ्यामधून आज पहाटे हा प्रकार समोर आला असून यामुळे बोऱ्हाडे परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या वनरक्षक पुजा पवार या वन कर्मचारी दिलीप वाघ , कल्पेश बढेकर यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.

बिबट्या
Nashik News : मोदींकडे देशाच्या विकासाची पुढच्या 25 वर्षांची ‘ब्ल्यू प्रिंट’ : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

विक्रम बोऱ्हाडे, भाऊसाहेब करंडे, पोपट बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, संकेत बोऱ्हाडे यांनी मदत करून आजूबाजूला पडलेल्या कोंबड्या आणण्यासाठी मदत केली परंतु काही सापडल्या तर काही सापडल्या नाहीत. माजी पंचायत समिती सदस्य रविंद करंजखेले, धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर जाधव, शिरदाळेचे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकारची माहिती घेतली तसेच या कुटुंबाला वनविभागाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

वाड्या वस्त्यावर अनेकदा रात्रीच्या वेळी वीज नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे त्यामुळे दुर्गम ठिकाणी सोलर वर चालणारे पथदिवे बसवावे अशी मागणी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.