पुणे - फुरसुंगी, उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काढलेली निविदा चांगलीच महागात पडत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने टिपींग शुल्कासाठी निश्चित दरापेक्षा पात्र ठेकेदाराने १३५ रुपये जादा दर लावला आहे. त्यामुळे १०० टन कचऱ्याचे बायोमायनिंग करताना तब्बल १३ कोटी ५० लाख रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहेत. हा दर अव्वाचा सव्वा असल्याने महापालिकेने ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी पत्र पाठवले आहे.