Bhor News : अनंतराव थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने भोर मध्ये तणाव

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या दिवाळी कीट वाटप करण्याच्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने भाषणात आमदार संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या विषयी अपशब्द वापरले.
Anantrao Thopte
Anantrao Thoptesakal
Updated on

भोर - भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या रविवारी (ता ६) सायंकाळी दिवाळी कीट वाटप करण्याच्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने भाषणात आमदार संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या विषयी अपशब्द वापरले.

अपशब्द वापरल्याची जाणीव होताच किरण दगडे पाटील यांनी संबंधित कार्यकर्त्यास दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आणि स्वतःही आपल्या भाषणांमध्ये दिलगिरी व्यक्त केली. अनंतराव थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याची बातमी आणि अपशब्द वापरल्याचे ऑडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर पसरले. यामुळे रात्री दहाच्या सुमारास काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली.

आमदार संग्राम थोपटे यांचे चिरंजीव पृथ्वीराज थोपटे हे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी शासनाच्या कायदे तज्ञांचे मत घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची सांगितले.

या उत्तरामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या घेतला. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यामुळे भोर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. अपशब्द वापरणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.