वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमास प्रारंभ

तेर पॉलिसी सेंटरच्या ‘ग्रीन ऑलिंपियाडचे' उद्घाटन संपन्न
वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमास प्रारंभ
वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमास प्रारंभsakal
Updated on

पुणे: तेर पॉलिसी (teree policy) सेंटरच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्रीन ऑलिंपियाडचे' (green olypiad) उद्घाटन सोमवारी विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून यावेळी सेंटरच्या डॉ. विनिता आपटे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

घट्टे म्हणाले, ‘‘पर्यावरण जपण्याचा विचार केवळ एक दिवस करून चालणार नाही. त्याचे महत्त्व सर्वांना पटवून देता आले पाहिजे. पूर्वी लहानपण हे निसर्गासोबत जायचे, आता ते तंत्रज्ञानाबरोबर जात आहे. निसर्गाची शिकवण आपल्यापासून दूर गेली आहे. मानवाची हाव वाढत असून निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती वाढत आहे. पुढील पिढ्यांना झाडे, टेकड्या, डोंगर चित्रातून दाखवायची वेळ येईल का ? याची भीती वाटते. खऱ्या निसर्गजीवनाला आपण मुकणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन ही चळवळ झाली पाहिजे.

वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमास प्रारंभ
पुणे : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी अटकेत

वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यासाठी ही ऑलिम्पियाड स्पर्धा ३ गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या ५०० विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले जाणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकाचे विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या शाळांनाही गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना www.terregreenolympiad.com या संकेतस्थळावर १६ सप्टेंबरपर्यंत विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. असे यावेळी संस्थेतर्फे माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे राधा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. तर कृष्णा पाटील यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.