नवले पुला सेल्फी पॉइंटने घेतले तीन बळी, १२ जखमी

नवले पुला जवळ आज पुन्हा विचित्र अपघात..
नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात.
नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात.Sakal
Updated on

धायरी :- मुंबई  बंगळुरू महामार्गावरील भूमकर पूल ते नवले पुला दरम्यान  नऱ्हे गावच्या  ठिकाणी सेल्फी पॉइंट जवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेंपो ट्राव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या झालेल्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच १२ जण जखमी झाले आहेत.तर आणखी मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार बंगळूर कडून मुंबईकडे थिनर टँकर निघाला होता. नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ या टँकरने बाजूने जाणाऱ्या टेंपो ट्रव्हेलारला कट मारण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात टँकरने टेंपो ट्राव्हलरला धडक दिली. त्यामुळे टेंपो ट्राव्हलर रोडच्या साईड पट्टीला धडकली व शेजारील सर्व्हिस रोड पट्टीला अडकली. त्यानंतर टँकरने पुढे टेम्पो ट्रॅव्हल व कंटेनर या दोन वाहनाला देखील धडक दिली. यामध्ये पाच वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस कर्मचारी यांनी रस्त्यावरील वहाने बाजूला काढत वाहतूक सुरुळीत करण्याचे काम रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.

नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात.
Covid19: राज्यात 40 मृत्यू, तर नव्या 1632 रुग्णांची भर 

अपघाताची माहिती मिळाल्यावर तातडीने एसीपी वाहतूक विजय चौधरी, सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, अग्निशमन दलाचे प्रभाकर उब्रटकर, पीएमआरडीए सुजित पाटील, सिंहगड वाहतूक पोलीस शाखेचे उदयसिंह शिंगाडे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()