धायरी/सिंहगड रस्ता : नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून आज पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला यात सुमारे 25 ते 26 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर पंचवीस ते तीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान सुमारे पावणे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.
दरम्यान या अपघातात जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले आहेत सुमारे 12 ते 15 रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आलेल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की 25 ते 26 गाड्या एकमेकांवर आदळल्या. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागले आहेत परिणामी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे.
याच दरम्यान नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर आणखीन एका कंटेनरने दोन चार चाकी गाड्यांना उडवले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडी आणखीन एक अपघात घडला. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला यात एकाच चारचाकीने एका दुचाकी स्वरस धडक दिली यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. बोगदा से दरी पूल या दरम्यान हा अपघात झाला.
पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी दखल घेतली आहे. आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.