Terrorist : 'त्या दोन्ही दहशतवाद्यांचा पुणे शहरात होता बॉम्बस्फोटाचा कट'; ‘एनआयए’ तपासात माहिती

पोलिसांनी नुकतेच अटक केलेले दोन संशयित दहशतवादी पुणे शहरातील संवेदनशील ठिकाणांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याच्या तयारीत होते.
Terrorist Arrested
Terrorist Arrestedsakal
Updated on

पुणे - पोलिसांनी नुकतेच अटक केलेले दोन संशयित दहशतवादी पुणे शहरातील संवेदनशील ठिकाणांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याच्या तयारीत होते. तसेच दुचाक्यांमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा त्यांचा डाव होता, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कुठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी येत्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाला सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.

पुण्यातील कोथरूड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत असताना महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही सध्या रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम (वय ३१, मूळ रा. पेलावल, ता. हजारीबाग, झारखंड) पसार झाला आहे.

या दोघांकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे पाकिट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खान आणि साकी शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या तयारीत असल्याचा संशय ‘एनआयए’ला आहे. त्या दृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. घरझडतीदरम्यान त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी एक काडतूसही जप्त केले आहे. मात्र पिस्तूल अद्याप सापडले नाही. साकी आणि खान हे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना सुफाशी संबधित असून, ते जयपूर येथे बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते.

प्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडे

या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी येत्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पसार झालेल्या महम्मद शाहनवाझ आलम (वय ३१, मूळ रा. पेलावल, ता. हजारीबाग, झारखंड) याचा पोलिस शोध घेत आहेत. या तिघांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केलेले आहे.

तिघेही दहशतवादी कोंढव्यातील मिठानगर परिसरात दीड वर्षापासून वास्तव्यास होते. पुढील तपासासाठी दोघांना एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांनी शनिवारी सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अनूचित घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याबाबत, तसेच नाकाबंदी आणि कोंम्बिग ऑपरेशन राबविण्याचा आदेश दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.