आता ‘टीईटी २०२१’ परीक्षेवर प्रश्न!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ नोव्हेंबरला घेतलेल्या ‘टीईटी’ परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि टीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून होत आहे.
TET exam
TET examsakal media
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ नोव्हेंबरला घेतलेल्या ‘टीईटी’ परीक्षा (TET Exam) रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि टीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून (Candidate) होत आहे. दरम्यान, २०२०मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर आता नोव्हेंबर २०२१मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता शालेय शिक्षण विभाग आणि परीक्षा परिषद नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेबाबत काय भूमिका घेणार!, याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

परीक्षा परिषदेने जानेवारी २०२०मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेमध्ये परीक्षार्थींना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार ते एक लाखांपर्यंतच्या रकमा स्वीकारून उमेदवारांना परीक्षेस पात्र केल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर २१ नोव्हेंबर २०२१मध्ये झालेल्या परीक्षेतही गैरव्यवहार झाला असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत.

TET exam
तांत्रिक अडचण आल्याने ‘सीटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली

परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील जवळपास एक हजार ४४३ परीक्षा केंद्रांवर २१ नोव्हेंबर रोजी टीईटी घेण्यात आली. या परीक्षेच्या ‘पेपर एक’साठी जवळपास दोन लाख ५४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील सुमारे दोन लाख १६ हजार उमेदवार परीक्षेत उपस्थित होते. या परीक्षेच्या ‘पेपर क्रमांक दोन’साठी जवळपास दोन लाख १४ हजार उमेदवारांची नोंदणी केली होती. त्यातील सुमारे एक लाख ८५ हजार उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतरिम उत्तरसूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. डिसेंबर अखेरपर्यंत ‘टीईटी २०२१’ परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची चिन्हे आहेत. परंतु ही परीक्षा रद्द करण्याच्या मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.

‘नोव्हेंबर २०२१मध्ये झालेली ‘टीईटी’ परीक्षा रद्द करावी. कारण २०२०च्या परीक्षेतील गैरव्यवहार पाहता २०२१च्या परीक्षेतही गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी. तसेच, परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी शिक्षण विभागाने आणि परीक्षा परिषदेने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी.’

- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असोसिएशन

TET exam
'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना भरतीसाठी वाढीव एक वर्षाची मुदत

‘राज्य सरकार, परीक्षा परिषदेवर विद्यार्थ्यांनी विश्वास कसा ठेवावा?, असा प्रश्न पडला आहे. या परीक्षेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ‘टीईटी २०२१’ची परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेतली पाहिजे. तसेच नव्याने परीक्षा घेताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च देखील राज्य सरकार आणि परीक्षा परिषदेने द्यावा.’

- श्रीकांत जाधव, परीक्षार्थी, नांदेड

‘आतापर्यंत राज्य परीक्षा परिषदेमार्फत सात वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली. शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून परीक्षा नव्याने घेण्यात यावी.’

- संदीप कांबळे, राज्य उपाध्यक्ष, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.