पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी चार दलालांना अटक केली आहे. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून या चौघा दलालांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखीन आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार आसल्याचे बोलले जात आहे. (Pune Cyber Police Arrest Four Agent In TET Exam Fraud Case)
पुणे सायबर पोलिसांना आरोग्य भरती परिक्षेचा तपास करताना टीईटी परिक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर टीईटी परिक्षेत घोटळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांसह दलालांना तसेच GA सॉफ्टवेअरच्या बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) आणि राजेंद्र सोळंकी अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.