परिंचे : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग व श्री नाथ मस्कोबा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील भक्त निवासात शंभर बेडचे सुसज्ज कोविड सेंटर साकारण्यात येणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ, खजिनदार आमोल धुमाळ, ट्रस्टचे विश्वस्त बाबुराव धुमाळ, संजय कापरे, राजेंद्र कुरपड उपस्थित होते. दरम्यान आमदार संजय जगताप यांनी वीर येथील भक्त निवासाची पहानी करून समाधान व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीर देवस्थान ट्रस्टचे भक्त निवास अधिग्रहण करून कोवीड सेंटर उभारण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप व तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशी देवस्थान ट्रस्टने पत्रव्यवहार करून कोवीड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. बारामती नगरपालिकेचे नगरसेवक अमर धुमाळ, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, राहुल धुमाळ यांनी या मागणीचा पाठपुरावा केल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या कोवीड सेंटरला तातडीने मान्यता दिली असून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व होप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा अग्रवाल यांनी भक्त निवासाची पाहणी केली असल्याचे संतोष धुमाळ यांनी सांगितले.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्त निवास, पिण्याचे शुद्ध पाणी, लाईट व रुग्णवाहिका पुरवण्यात येणार असल्याचे सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले. वीर येथे कोविड सेंटर होण्याची मागणी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली असल्याचे पुरंदरच्या माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्या अर्चना जाधव यांनी केली असल्याचे सांगितले. वीर येथे होणाऱ्या कोवीड सेंटरला जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी सांगितले आहे.
श्री नाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टचा उपक्रम कौतुकास्पद असून वीर येथे सुरू होणाऱ्या कोविड सेंटरसाठी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. परिंचे परिसरातील खाजगी डॉक्टरांना येथील कोविड सेंटरला सेवा पुरवण्यासाठी विनंती करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर येथील कोवीड सेंटर दक्षिण पुरंदर मधील नागरिकांना वरदान ठरणार असून दिवे, सासवड, जेजुरी येथील कोवीड सेंटरचा तान कमी होणार असल्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी सांगितले यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, महेश राऊत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.