Gokhale Institute : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूंची नियुक्ती वादात

कुलपती डॉ. राजीव कुमारांनी मागविला खुलासा; विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
Gokhale Institute
Gokhale Institute
Updated on

पुणे ः गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे (गोखले इन्स्टिट्यूट) कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती आता वादाचा विषय ठरली आहे. संस्थेचे कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये अस्विकार्य वर्तन आणि नियुक्ती संदर्भात फसवणूकी सारखे गंभीर आरोप करण्यात आले आहे. दरम्यान कुलगुरू डॉ. रानडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Gokhale Institute
Nashik News : जोरदार पाऊस नसतानाही 3 वाडे कोसळले! अनेक वर्षापासून समस्या ‘जैसे थे’

२७ जून २०२४ रोजी डॉ. रानडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यात डॉ. रानडे यांनी त्यांच्या नियुक्तीच्या वेळी आवश्यक पात्रतेचे निकषांबद्दल फसवणूक करणे, तसेच महत्त्वाची माहिती लपविणे, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि महाराष्ट्र सरकार यांच्याशी तथ्यांची चुकीची मांडणी करणे असे आरोप करण्यात आले आहेत. तसेच संस्थेमध्ये अनावश्यक पदे निर्माण करत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांचे स्पष्टीकरण मागविण्यात आले आहेत. या कृतींमुळे गोखले संस्थेचा प्रतिष्ठात्मक नुकसान व आर्थिक तोटा झाला असून, दोन आठवड्यात उत्तर पाठविण्याचे बजावण्यात आले होते. डॉ. रानडे यांनी या संदर्भात कुलपतींना उत्तर पाठविले आहे.

Gokhale Institute
Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

कुलगुरू पदासाठी स्वतःच्याच निवडीचा आरोप ः

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार कुलगुरू पदासाठी १० वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव गरजेचा आहे. डॉ. अजित रानडेंकडे तो नाही. कुलगुरू होण्यापूर्वी डॉ. रानडे गोखले इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. तसेच कुलगुरू शोध आणि निवड समितीसाठीच्या सदस्याची निवड डॉ. रानडे यांच्या स्वाक्षरीने झाली. त्यामुळे एकंदरीत डॉ. रानडे यांची कुलगुरू पदाची निवड ‘कॉम्फ्लीक्ट ऑफ इंट्रेस्ट’ आहे. मुरली कृष्णा या माजी कर्मचाऱ्याने माहिती अधिकारात हे उघड केले आहे, असा आरोप प्रकरणाचा पाठपुरावा करणारा विद्यार्थी कार्यकर्ता नीलेश पाडेकर यांनी केला आहे. डॉ. रानडे यांची पर्सिस्टंट सिस्टिम्स मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून असलेली भूमिका आणि नैतिकतेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत, असेही पाडेकर म्हणाले.

Gokhale Institute
Nashik News : कसमादेत 15 महिन्यात 501 जणांना सर्पदंश; एकाचा मृत्यू

विद्यार्थी संघटनांचे आंदोलन ः

डॉ. अजित रानडे यांच्या कुलगुरू पदावरील निवडी विरोधात विद्यार्थी संघटनांनी शुक्रवारी (ता.१२) आंदोलन केले होते. कुलगुरूंची निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला. एका व्यक्तीच्या खुर्चीच्या हव्यासापोटी गोखले इन्स्टिट्यूटच्या अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी तडजोड करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला असून, या संदर्भात उच्च न्यायालयात कायदेशीर दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. माझी नियुक्ती पारदर्शक पद्धतीने झाली असून, सर्व नियमांचे आणि मानकांचे पालन करण्यात आले आहे. तसेच सर्व वैधानिक अधिकाऱ्यांना आवश्यक उत्तरे देण्यात आली आहेत.

- डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.