Walchandnagar News : रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे युवकांना पडले महागात..

Walchandnagar News : वालचंदनगर पोलिसांनी वाढदिवस असणाऱ्या (बर्थडे बाॅय) युवकासह मित्रांना पोलिस ठाण्यामध्ये आणून समज दिली.
the birthday boy and friends received a warning from the police
the birthday boy and friends received a warning from the police sakal
Updated on

वालचंदनगर : येथे मुख्य रस्त्यावरील चौकामध्ये दुचाकीवर केक ठेवून कापून वाढदिवस साजरे करणे युवकांना महागात पडले. पोलिसांनी वाढदिवस असणाऱ्या (बर्थडे बाॅय) युवकासह मित्रांना पोलिस ठाण्यामध्ये आणून समज दिली.

ग्रामीण भागामध्ये रस्त्याच्या मुख्य चौकामध्ये दुचाकी आडवी लावून गाडीवरती केक कापण्याची युवकामध्ये क्रेझ आहे. अनेक गावामध्ये युवक अशाच प्रकारे वाढदिवस साजरे करीत असल्याचे प्रकार घडत असून याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

वालचंदनगर पोलिसांनी या रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसापूर्वी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, गणेश काटकर व किसन बेलदार हे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गस्त घालण्यासाठी काझड गावातुन जात होते. यावेळी सागर नरुटे (वय ३२,रा.काझड) या युवक रस्त्यावरच गाडी आडवी लावून गाडीवरती केक ठेवून वाढदिवस साजरा करीत होता.

त्याच्याबरोबर असणाऱ्या दहा-बारा मित्र होते. सहायक पोलिस निरीक्षक राजुकमार डुणगे यांनी सर्वांनी चारचाकी गाडीमधून जंक्शनमधील वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये आणून समज दिली. सर्व युवकांनी समाजातील नागरिकांची माफी मागून पुन्हा असे करणार नसल्याचे सांगून इतर युवकांनी असे वाढदिवस साजरे करु नका असे ही सांगितले.

the birthday boy and friends received a warning from the police
#TrafficUpdates : पुणेकरांनो...'या' रस्त्यावर आहे सध्या वाहतूक कोंडी 

रस्त्यावर वाढदिवस साजरा होत असल्यास पोलिसांना कळवा...

चौकटरस्त्यावरील गाडी आडवी लावून वाढदिवस साजरे केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असतो.यापुढे वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरे केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.तसेच गावामध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरा होत असल्यास तातडीने वालचंदनगर पोलिसांशी संपर्क साधवा.संपर्क साधणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून कारवाई करण्यात येणार असल्याचे वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.