पुणे शहराने पार केला 25 लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा

Corona Test
Corona Testesakal
Updated on

पुणे : पुणे शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर 1 तारखेपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान ''चाचण्यांच्या संख्येत सातत्य ठेवल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. कोरोनाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा पार पडला असून 1 जूनला कोरोना चाचण्यांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टिव्ट करुन दिली आहे. (The city of Pune has crossed the milestone of 25 lakh corona tests)

पुणे शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 483 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 10 हजार 184 इतकी झाली आहे.

Corona Test
पुणे महापालिकेच्या १३९ केंद्रांवर आज लसीकरण
Corona
CoronaMedia Gallery

पुणे शहरात आज नव्याने 467 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 70 हजार 778 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात एकूण 1836 रुग्ण बाधित झाले असून त्यापैकी शहरात - 467, पिंपरी चिंचवड - 372, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 803, नगरपालिका क्षेत्र - 170, कॅंटोन्मेंट बोर्ड -24 रुग्ण बाधित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3502 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील 651कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 57 हजार 160 झाली आहे.

Corona Test
कोरोना बाल रुग्णांसाठी १०८ बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती
corona fight
corona fightcorona fight

दरम्यान जिल्ह्यात आज एकूण 60 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी शहरातील 29 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात 8 हजार 313 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. शहरात एकूण 5305 रुग्णांवर उपचार सुरु असून 761 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.