Pune Metro : कोथरूडकरांना भावली मेट्रो ; पुण्यात दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या पोहचली लाखावर

शहरातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या आता एका लाखाहून अधिक झाली आहे. त्यात वनाज ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी संख्या पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गापेक्षा जास्त आहे.
Pune Metro
Pune Metrosakal
Updated on

पुणे : शहरातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या आता एका लाखाहून अधिक झाली आहे. त्यात वनाज ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी संख्या पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गापेक्षा जास्त आहे.

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे या वर्षी सहा मार्चला उद्‌घाटन झाले. तत्पूर्वी दोन्ही मार्गांवर मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ५५ हजार होती. त्यानंतर पाच महिन्यांत सरासरी प्रवासी संख्या आता एक लाखाहून अधिक झाली आहे.

मेट्रोच्या प्रवासी संख्येत होत असलेली वाढ चांगली आहे. वाढत्या संख्येमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होत आहे. ‘एक पुणे कार्ड’लाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अधिकाधिक मार्गांवर पीएमपी व महामेट्रो फिडर सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- श्रावण हर्डीकर,

व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.