खडकवासला धरणातील विसर्ग दुपारनंतर पुन्हा वाढला

खडकवासला धरणातील विसर्ग दुपारनंतर पुन्हा वाढला
Updated on

खडकवासला : खडकवासला धरणातील विसर्ग शुक्रवारी संध्याकाळी रात्री २५ हजार क्यूसेक होता. यावेळी धरणातील येवा देखील २६ हजार क्यूसेक होता. परंतु पाऊस कमी झाल्याने धरणातील कमी झाल्याने धरणातील विसर्ग देखील कमी करण्यात आला. परंतु शुक्रवारी सकाळी पाऊस वाढल्याने पुन्हा विसर्ग वाढवावा लागला आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

खडकवासला धरणातील विसर्ग दुपारनंतर पुन्हा वाढला
भिडे पुलावर अडकली जलपर्णी; वाहतूक बंद

असा वाढला विसर्ग

गुरुवारी पाच वाजता पाणी सोडण्यास सुरवात झाली. दोन हजार ४६६, सात वाजता पाच हजार ११८, नऊ वाजता १० हजार ९६, दहा वाजता १८ हजार ४९१, अकरा वाजता ३५ हजार ०३६ क्यूसेक पर्यंत वाढला होता.

मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करावा लागला. मध्यरात्री तीन वाजता १८ हजार ४९१, पहाटे चार वाजता नऊ हजार ३९४, सकाळी सहा वाजता चार हजार २६०, आठ वाजता दोन हजार ५५३ क्यूसेक पर्यंत कमी केला होता. दुपारी एक वाजता तीन ४१२, दोन वाजता सात हजार ६९५ क्यूसेक केला आहे.

पाऊस कमी झाल्यामुळे तो मध्यरात्रीनंतर विसर्ग कमी झाली आहे. सकाळी आठ फक्त दोन हजार ५५३क्यूसेक केला होता. सकाळी दहा वाजल्या नंतर पाऊस पुन्हा वाढल्याने दुपारी एक वाजता तीन हजार ४१२ क्यूसेक पर्यंत वाढविणार आहे.

खडकवासला धरणातील विसर्ग दुपारनंतर पुन्हा वाढला
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

पाऊण टीएमसी वाढले

गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता पाणी सोडण्यास सुरवात केली. आज दुपारी दोन वाजता वाजेपर्यंत ०.७६ टीएमसी मुठा नदीत पाणी सोडले.

शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पडलेला पाऊस टेमघर २७०, पानशेतला १७०, वरसगाव १७० व खडकवासला धरण येथे २०मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी सहा ते दुपारी पर्यंत पडलेला पाऊस

टेमघर १०७, पानशेतला ३३, वरसगाव ६६ व खडकवासला धरण येथे ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जल विज्ञान प्रकल्पच्या संकेत स्थळावर नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()