पुणे : गाड्या ट्रॅकवरून गेल्यावर क्रीडा संचलनालयाला उपरती!

पुणे : गाड्या ट्रॅकवरून गेल्यावर क्रीडा संचलनालयाला उपरती!
Updated on

पुणे ः ॲथलेटिक्सच्या ट्रॅकवरून ‘व्हिआयपी’ंच्या गाड्या गेल्यावर राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाला उपरती झाली. या पुढे अशा पद्धतीने ट्रॅकवरून गाड्या जाणार नाही, याचे काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अनुषंगाने शनिवारी (ता. २६) म्हाळुंगे - बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी जाताना मान्यवरांच्या मोटारी या ॲथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रॅकवरून गेल्या. मान्यवरांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडा व युवक राज्यमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे आदींचा समावेश होता. ॲथलेटिक्सच्या ट्रॅकवरून मोटारी गेल्याची छायाचित्रे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यावर क्रीडा क्षेत्रातून त्याबद्दल नाराजी व्यक्त झाली.

पुणे : गाड्या ट्रॅकवरून गेल्यावर क्रीडा संचलनालयाला उपरती!
पुणे बंगळूर महामार्गावर ट्रक पलटी; वाहतुक सुरळीत सुरु

या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, ‘ॲथलेटिक्स ट्रॅक शेजारील सिमेंट काँक्रीटवरुन एकच गाडी जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, ताफ्यातील काही गाड्या अचानक ट्रॅकवर गेल्या. या प्रकारामुळे ट्रॅकचे नुकसान झालेले नाही. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही, याचे काटेकोर नियोजन आम्ही केले आहे.

पुणे : गाड्या ट्रॅकवरून गेल्यावर क्रीडा संचलनालयाला उपरती!
पुणे बंगळूर महामार्गावर ट्रक पलटी; वाहतुक सुरळीत सुरु

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून या पुढे असे प्रकार होणार नाही, यासाठी त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. ॲथलेटिक्स ट्रॅक तसेच मैदानावरही कोणत्याही प्रकारची वाहने जाणार नाही, याचीही काळजी घेण्यास केदार यांनी बजावले आहे.

पुणे : गाड्या ट्रॅकवरून गेल्यावर क्रीडा संचलनालयाला उपरती!
पुणे विद्यापीठाचा ‘मास कम्युनिकेशन' विभाग देशामध्ये चौथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()