पुणे : पुणे महापालिकेत नोकरी मिळावी म्हणून हजारो तरुण अर्ज करतात, परीक्षा देतात. पण त्यातून मोजकेच उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतात. पण हे उमेदवार एकाच वेळी अनेक ठिकाणी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. त्यांना महापालिकेपेक्षा चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत असल्याने महापालिकेच्या नोकरीला राम राम ठोकत आहेत. गेल्या वर्षभरात ७१ जणांनी नोकरी सोडली आहे तर बदललेली कार्यपद्धती, आरोग्य, कामाच्या ताणामुळे १३ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.