पुणे : भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आवारात दररोज साधारणतः तीन ते चार हजार तीनचाकी टेम्पो, छोटे हत्ती येतात. या प्रत्येक चालकांकडून बाजारातील एक संघटना सक्तीने १०० ते २०० रुपये अनाधिकृत पणे वसुली करतात. या दादागिरीला ब्रेक लावण्यासाठी आता बाजार समितीने कंबर कसली आहे. तसेच यामुळे समितीच्या उत्पन्नात १ कोटी ३३ लाखांची भर पडणार आहे.
बाजारात दररोज ७०-८० जण वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून प्रत्येकजण गाडीची पार्किंगची व्यवस्था, निगराणी केली म्हणून पार्किंग शुक्ल आणि माल लावण्याचे काम न करता १०० ते २०० रुपये वसूल केले जात आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून बाजारात येणाऱ्या तिनचाकी टेम्पो, छोटे हत्ती यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चालकांकडून दमदाटी करून सक्तीने १०० ते २०० रुपये अनाधिकृत पणे वसूल करतात. बाजारात आलेल्या वाहनाला जागा ठेवणे. दुसऱ्या चालकांना गाडी न लावू देणे असे प्रकार घडत आहेत.
समितीने ही वसुली थांबण्यासाठी आता बाजार आवारात वाहनतळ निर्माण केले आहेत. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या तीनचाकी टेम्पो, छोटे हत्ती यांच्याकडून पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे या संघटनेकडून बाजार आवारात होणाऱ्या वसुलीला ब्रेक लागणार आहे. बाजार समितीने याबाबत निविदा प्रक्रिया राबवून १ कोटी ३३ लाख रुपयांना हे टेंडर दिले आहे.
बाजार अवतारातील दादागिरी मोडीत काढणे. येणाऱ्या वाहनांना शिस्त लावणे आणि बाजार समितीला उत्पन्न सुरु करण्यासाठी मागील ४० वर्षात पहिल्यांदाच ही पार्किंग निविदा काढली गेली आहे. काम न करता पैसे मागत असतील तर वाहन चालकाने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करुन एक प्रत बाजार समितीस द्यावी. तसेच बाजार समिती अशा कामगारांची परवाना रद्द करण्याची कारवाई करेल.
-मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
मंगळावरपासून पार्किंग शुल्क- बाजारात शेतमाल खरेदीसाठी येणाऱ्या तीनचाकी टेम्पो , छोटा हत्ती, पीकअप या वाहनांसाठी बाजार आवारात ठरवून दिलेल्या जागेत वाहन पार्क केल्यास दोन तासांसाठी ५० रुपये, तर टेम्पो, पीकअप वाहनांसाठी १०० रुपये पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे. तसेच त्यानंतरच्या प्रत्येक एका तासासाठी अनुक्रमे ५० रु व १०० रुपये आकारले जाणार आहेत. मंगळवारपासून ( ता.२५ ) हे शुल्क आकारले जाणार आहे. पार्किंगचे शुल्क पार्किंग ठेकेदार किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधीकडेच द्यावे व पावती जतन करुन ठेवावी. असे समितीने परिपत्रक काढले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.