पुणे : शहरात आजपासून (मंगळवार) १८ वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण एकदा सुरू होणे अपेक्षित असताना आता पुणे महापालिकेने एक दिवस उशीराने याची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे मोफत लसीकरण बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिलेली आहे. (The next free vaccination of Above 18 will start from tomorrow pune)
पुणे शहरामध्ये सध्या 30 वयाच्या पुढील नागरिकांचे मोफत लसीकरण शहरातील विविध केंद्रांवर होत आहे. तर खाजगी रुग्णालयात अठरा वयाच्या पुढील नागरिकांचे सशुल्क लसीकरण केले जात आहे. व्यवसाय, नोकरी, शिक्षण यासाठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असताना त्यांचे लसीकरण केले जात नव्हते. केंद्र सरकार कडून पुरवठा अपुरा होत असल्याने 18 ते 44 या वयोगटाचे मोफत लसीकरण जवळपास महिनाभर बंद होते. पुणे महापालिकेने गेल्या चार दिवसापासून 30 ते 44 यावे गटाचे लसीकरण सुरू केले आहे.
केंद्र सरकारने आज पासून देशात 18 ते 44 या वयोगटासाठी लस पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, सोमवारी प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार लसीकरणात 18 ते 29 या वयोगटासाठी लस उपलब्ध केलेली नव्हती. आता बुधवारपासून या वयोगटासाठी लस उपलब्ध केली जाईल. तसेच केंद्र निश्चिती पण केली जाणार आहे. याबाबतचे सविस्तर नियोजन आज दुपारपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ यांनीदेखील ट्विटर वरून बुधवारपासून १८ च्या पुढील नागरिकांचे मोफत लसीकरण होणार असल्याचे जाहीर केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.