दुबार मतदारांची संख्या घटली, अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला

प्रारूप मतदारयादी एक नोव्हेंबरला प्रसिद्ध करणार
मतदार यादी
मतदार यादीsakal
Updated on

पुणे: निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदारयादी येत्या एक नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे आणि हरकती सूचना स्वीकारण्याचा कालावधी एक ते ३० नोव्हेंबर राहील. दावे आणि हरकती २० डिसेंबरपर्यंत निकालात काढण्यात येतील. त्यानंतर ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दुबार मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे समोर आले आहे.

मतदार यादी
रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

६१ हजारांहून अधिक दुबार नावे वगळली

जिल्हा निवडणूक विभागाकडून दुबार आणि छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. १५ जानेवारीअखेर दुबार मतदारांची संख्या ८८ हजार ७२४ होती. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरी भेटी दिल्या. मृत व्यक्ती आणि एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव नोंदणी झालेल्या मतदारांची माहिती घेउन ६१ हजार ७८७ नावे वगळण्यात आली. त्यामुळे दुबार मतदारांची संख्या आता २६ हजार ९३७ इतकी आहे.

पावणेतीन लाख छायाचित्राविना

जिल्ह्यात मतदारयादीमध्ये चार लाख ६ हजार ५८९ मतदारांची छायाचित्रे नव्हती. विशेष मोहिमेदरम्यान काही मतदार कायमस्वरूपी इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे आढळून आले. तसेच, काही मतदारांनी त्यांची छायाचित्रे दिली. त्यामुळे छायाचित्राविना मतदारांची संख्या दोन लाख ८६ हजारांपेक्षा अधिक आहे.

मतदार यादी
बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

"जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष मोहीम राबवून दुबार मतदारांची संख्या कमी करण्यात आली. तसेच, विनाछायाचित्र मतदारांची संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. वोटर हेल्पलाइन अॅपद्वारे नागरिकांना नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे किंवा नावामध्ये दुरुस्ती करता येते. त्यामुळे नागरिकांनी वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करून त्याचा अधिकाधिक वापर करावा" - मृणालिनी सावंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील स्थिती :

विधानसभानिहाय मतदारसंख्या (१५ जानेवारी २०२१ अखेर)

मतदारसंघ मतदार

जुन्नर ३०२१७६

आंबेगाव

२८९७८९

खेड ३३०३२९

शिरूर ४११६०२

दौंड ३१५५८३

इंदापूर ३१५२२५

बारामती ३४९७३४

पुरंदर ३६९४३२

भोर ३७३०११

मावळ ३५४८७४

चिंचवड ५२८८६८

पिंपरी ३५७८१२

भोसरी ४५१३५७

वडगावशेरी ४६१९७६

शिवाजीनगर ३०६४२०

कोथरूड ४१३३८९

खडकवासला ४९५९७६

पर्वती ३५४४७१

हडपसर ५१९७१७

पुणे कॅन्टोंन्मेंट २९२९०९

कसबा पेठ २९३२२४

एकूण मतदार ७८ लाख ८७ हजार ८७४

पुरुष मतदार ४१ लाख २८ हजार ३९२

महिला मतदार ३७ लाख ५९ हजार २८९

तृतीयपंथी मतदार १९३

छायाचित्र नसलेले मतदार २ लाख ८६ हजार ८२१

दुबार मतदार २६ हजार ९३७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()