पुणे : हडपसरमधल्या आदित्यला कोरोना झाला अन् काही तासांतच त्याची तब्येत बिघडली. ती आणखी बिघडण्याच्या भीतीने उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी चार-पाच हॉस्पिटल पालथी घातली, पण बेड काही मिळाला नाही. शेवटी आदित्यला शिवाजीनगरातल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ते थेट 'आयसीयू'तच नेमक्या उपचारानंतर आठवडाभरात तेरा वर्षांचा आदित्य ठणठणीत झाला, त्याला रविवारी घरीही सोडलं गेलं.
आदित्यच्या तब्येतीपासून धडा घेत, जम्बोत लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचे नियोजन महापालिका आणि जम्बो व्यवस्थापनाने केले आहे म्हणजे, गरीब आणि गरजू कुटुंबातली लहानग्यांना जम्बोतही मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्याचा निर्णय जम्बो व्यवस्थापनाने घेतला आहे. कोरोनाचे निदान, त्यानंतरचा शारीरिक त्रास होऊनहीं कुठेच उपचार न मिळालेल्या आदित्यला ८ मेला मध्यरात्री जम्बोत आणले गेले, बेड 'बुक' नसल्याने सुरवातील डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. त्याची अवस्था पाहून डॉ. श्रेयांस कपाले यांनी त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले. त्यानंतरच्या काही मिनिटांतच आदित्यला 'आयसीय त हलविले पहिल्या दोन दिवसानंतर आदित्यची तब्येत सुधारली आणि त्याला साधारण वॉर्डात आणले.
एवढ्या कमी वयात आदित्यची तब्येत खराब झाल्याचे पाहून आणि तिसऱ्या लाटेची वाट न पाहता जम्बोत लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्डची सोय करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या वॉर्डात ५० मुलांना उपचाराची व्यवस्था राहणार असून, त्यांना आयसोलेशनपासून ऑक्सिजन आणि 'आयसीयू' बेडही उपलब्ध होणार आहेत.
जम्बोचे अधिष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रेयांस कपाले म्हणाले, "आदित्यला वेळेत आणि नेमके उपचार दिल्याने तो कमीत कमी दिवसांत बरा होऊ शकला. तरीही त्याला एका मिनिटाला १५ लिटर ऑक्सिजनची गरज भासली. उपचार आणि त्याचा प्रतिसाद यावर सतत लक्ष ठेवले गेले. "
"लहान मुलांसाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा, त्यांचा दर्जा आणि प्रत्यक्ष उपचार याचे नियोजन करून पुढील टप्प्यात लहान मुलांना दाखल करून घेण्यात येईल, असे जम्बोचे समन्वय राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आतापासूनच मुलांसाठीची उपचार व्यवस्था विस्तारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. येरवड्यातील महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. तर महापालिकेच्या अन्य रुग्णालयांतही तशा प्रकारची सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातच जम्बोतही ५० बेडची सोय केली जाणार आहे.
''कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांना उपचारासाठी प्राधान्य असेल या आजारावरील उपचार व्यवस्थेत मुलांना कमीत कमी वेळेत बेड पुरविण्यात येतील. त्याचा भाग म्हणून जम्बोतही सर्व यंत्रणा उभारून लहान मुलांवर उपचार होतील महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्येही बेड उपलब्ध केले जाणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जात आहे.''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.