Pune News : पोलिसांनी बाल न्याय मंडळात दिलेला अर्ज काही मिनिटांत घेतला मागे

मुलाचा बालसुधारगृहातील ताबा १० दिवस वाढविण्याबाबत केला होता अर्ज
न्याय व्यवस्था
न्याय व्यवस्था sakal
Updated on

पुणे ः कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आणखी १० दिवस बालसुधारगृहात ठेवण्याबाबत दाखल केलेला अर्ज पुणे पोलिसांनी काही मिनिटांत परत घेतला आहे. सोमवारी (ता. ३) हा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र त्या अर्जात काही दुरुस्ती असल्याचे सांगत तो मागे घेण्यात आला आहे.

न्याय व्यवस्था
Nanded News : नाल्यात सापडली ४६ वर्षांपूर्वीची ४३६ काडतुसे

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुलाला आणखी १० दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो परत घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कौटुंबिक मित्रांकडे मुलाचा ताबा द्यावा

बालसुधारागृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अग्रवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांना सोमवारी मंडळात दाखल केला आहे. हे कुटुंबीय अग्रवाल राहत असलेल्या परिसरातच रहायला आहे. मंडळातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे. मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले होते. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.