Chakan Market: पावसाने पुन्हा जोरदार आगमन केल्याने कोथिंबिरीचे भाव घसरले..

Farmers are worried due to the decline in vegetable prices in the Chakan market: शेतकऱ्यांचे नुकसान; बाजार आवारात जुड्यांची पन्नास हजारांवर आवक.
chakan vegetable market
chakan vegetable market sakal
Updated on

Chakan: चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात कोथिंबिरीच्या जुड्यांची सुमारे पन्नास हजारांवर आवक झाली. पंचवीस, तीस रुपयांवर गेलेला कोथिंबिरीच्या एका जुडीचा भाव रविवारी (ता. 14) मातीमोल झाला. पावसाने पुन्हा जोरदार आगमन केल्याने कोथिंबिरीचे भाव घसरले आहेत.

टोमॅटोची आवक सातारा तसेच नगर जिल्ह्यातून होत आहे. टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. टोमॅटोचे भाव पुढील काळात शंभरी गाठतील अशी शक्यता व्यापारी, शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. टोमॅटोचे भाव तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलेले आहे. परंतु, फळभाज्यांचे भाव वाढत आहे. फळभाज्यांची आवक कमी होत असल्याने व पावसाचा परिणाम असल्याने फळभाज्यांचे भाव वाढत आहे.

कर्नाटक राज्यातून सुमारे तीस टन हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव घाऊक बाजारात प्रति किलोला 40 ते 60 रुपये राहिले. हिरवी मिरची किरकोळ बाजारात 80 ते शंभर रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ही भाववाढ मोठी आहे. टोमॅटोची शनिवारी ए(ता. 14) ला सुमारे वीस टन आवक झाली. टोमॅटोचे भाव 14 ते 60 रुपये राहिले. टोमॅटोच्या भावात अगदी 30 ते 50 रुपयांनी मोठी वाढ झाली आहे. टोमॅटोचे भाव अजून वाढणार आहेत, अशी शक्यता शेतकरी, व्यापारी यांच्याकडून वर्तविली आहे.

chakan vegetable market
Motivation News : शेतकऱ्याची मुलगी झाली पोलिस

कांद्याची सुमारे 1000 क्विंटल आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला 20 ते 30 रुपये भाव मिळाला. भावात दोन रुपयांनी घसरण झाली. बटाट्याची सुमारे अडीच हजार क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिकिलोला सुमारे 25 ते 30 रुपये भाव मिळाला. बटाट्याचे भाव वाढत आहेत. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची मोठी आवक होत आहे. या बटाट्याला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात बटाटा प्रतिकिलोला चाळीस रुपये भावाने विकला जात आहे.

कांद्याचे भाव अजून वाढतील अशी शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कोथिंबिरीची एक जुडी घाऊक बाजारात भाव घसरून अगदी चार, पाच, दहा रुपयाला एक या भावाने विकली जात आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

परराज्यातून लसणाची आवक

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात रविवारी लसणाची आवक गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या परराज्यातून झाली. ही आवक तीस टन झाली असून भाव प्रतीकिलोला 120 ते 180 रुपये आहे. किरकोळ बाजारात लसूण दोनशे रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. लसणाचे भाव मात्र घसरत नाही. लसणाचे भाव अजून वाढतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

chakan vegetable market
Power shortage: आंदर मावळातील ५० गावांना विजेचा ‘झटका’

फळभाज्यांचे किलोचे भाव

हिरवी मिरची - 40 ते 60 रुपये,परवल -50 रुपये, हिरवा वाटाणा -100 रुपये, भेंडी - 50 रुपये, टोमॅटो - 40 ते 60 रुपये, गवार - 50 ते 70 रुपये, फ्लॉवर 15 ते 20 रुपये, कोबी 25 ते 30 रुपये, दुधी भोपळा 15 ते 20 रुपये, राजमावाल - ५० ते ६० रुपये, तुरमुड्यावाल -70 रुपये, चवळी - 25 ते 35 रुपये, शेवगा - 50 ते ७० रुपये, ढोबळी मिरची - 40 ते 60 रुपये, अद्रक 80 ते 100 रुपये, तोंडले - 30 रुपये, डांगर भोपळा - 40 रुपये, वांगी - 15 ते 25 रुपये, काकडी -20 रुपये, गाजर 20 ते 30 रुपये.

पालकची जुडी 10 रुपयाला

कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर, मेथीची आवक सध्या वाढते आहे. मेथीची एक जुडी 10 रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी अगदी चार, पाच रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी पाच ते 10 रुपयाला विकली गेली. पालकची एक जुडी 6 ते 10रुपयाला विकली गेली.

chakan vegetable market
One Nation One Rate: सोने होणार स्वस्त! देशभरात असणार एकच भाव, काय आहे 'वन नेशन वन गोल्ड रेट' धोरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com