पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) दिवसांतील नवीन कोरोना रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले. मागील सव्वा महिन्याच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच हे घडले आहे. पुणेकरांना कोरोनाच्या बाबतीत दिलासा देणारी ही बातमी ठरली आहे. जिल्ह्यात आज ७ हजार ८८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ४ हजार २०६ रुग्ण आहेत. दिवसभरात जिल्ह्यात ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील ४६ मृत्यू आहेत. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी शहरातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ९ ने कमी झाली आहे. दिवसातील एकूण मृत्यूंमध्ये पिंपरी चिंचवडमधील २६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १६ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी तीन मृत्यू आहेत.
आज १० हजार ५७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ८९५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ३५२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ९५१, नगरपालिका हद्दीतील ३६७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार ५१७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ६६७, नगरपालिका हद्दीतील ४१५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ८३ रुग्ण आहेत. सद्यःस्थितीत २२ हजार ३४१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय ७४ हजार ८५१ गृहविलगीकरणात आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८ हजार २९३, पिंपरी चिंचवडमधील ६ हजार १३६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार २६२, नगरपालिका हद्दीतील २ हजार ८४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५६६ रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.