रविवारपेठेतील बाजारपेठ अडकली वाहतूक कोंडीच्या विळाख्यात

रविवारपेठेतील बाजारपेठ अडकली वाहतूक कोंडीच्या विळाख्यात
Updated on

स्वारगेट : शहराच्या मध्यवर्ती भागात किरकोळ ते होलसेलपर्यँत सर्व वस्तू ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असणाऱ्या सुप्रसिद्ध रविवार पेठेतील बाजारपेठेला अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने विळखा घातला आहे. टू व्हीलरच काय साधे चालणेही या ठिकाणी अवघड होऊन बसले आहे .

रस्त्यावरच अनेक ठिकाणी अवैध दुकाने थाटली असल्याने व्यापारी वर्ग आणि आलेला ग्राहक यांना पेठेत जाण्यासाठी दमछाक होत आहे .यावर प्रशासनाने वेळीच कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी तिथे खरेदीसाठी आलेले प्रताप ठिगळे यांनी केली .

रविवार पेठ शहरातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे .या ठिकाणी कोणती वस्तू मिळत नाही असे होत नाही. या बाजारपेठेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे पूर्ण शहरातून या बाजारपेठेत ग्राहक येत असतो. या ठिकाणी रस्तेही अतिशय अरुंद आहेत आणि त्यात अनेक छोट्या दुकानदारांनी रस्त्यावरच दुकाने थाटली असल्याने पूर्ण रस्ताच बंद होऊन जातो त्यामुळे या ठिकाणी दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसते .त्याचबरोबर या ठिकाणी आलेला ग्राहक वर्ग व व्यापारी वर्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अवैध पार्किंग केल्याने वाहनांना जाणे अवघड होऊन बसते त्यामुळे वाहतूक कोंडी ही रविवार पेठेतील नित्याचा विषय बनला आहे. आमची यातून सुटका करावी अशी मागणी रविवार पेठेतील व्यापारी वर्ग व नागरिकांनी केली आहे.

रविवारपेठेतील बाजारपेठ अडकली वाहतूक कोंडीच्या विळाख्यात
पुढील 4 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज

''अक्षरश: आमचा चालताना सुद्धा दम घुटतो..चालता चालता कोण पाठीमागून धडकून जाईल सांगता येत नाही. या पेठेतून चालणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे. रस्त्यावर थाटलेली अवैद्य दुकाने आणि अवैध पार्किंग या वाहतूक कोंडीस जबाबदार आहेत. यांच्यावर प्रशासनाने वेळीच कारवाई करावी.''

- नवीन राठी (व्यापारी )

''आम्ही वेळोवेळी या ठिकाणी कारवाई करत असतो. त्यात या बाजारपेठेत रस्तेही अरुंद आहेत. रस्त्यावर दुकान थाटणारे आणि अवैद्य वाहतूक पार्किंग करणारे यांच्यावर यापुढे आणखी तीव्रपणे कारवाई करू''

- राधिका फडके (फरासखाना, वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक)

रविवारपेठेतील बाजारपेठ अडकली वाहतूक कोंडीच्या विळाख्यात
'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटचं काल उद्घाटन अन् आज तोडफोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.