Pune: नवले पूलावर होत असलेल्या अपघातांच्या चौकशी समितीचा अहवाल तयार; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना
navale pool accident
navale pool accidentesakal
Updated on

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

navale pool accident
Ajit Pawar Latest : एन्रॉनचा उल्लेख करत बारसू रिफायनरीवर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

गेल्या रविवारी या महामार्गावरील स्वामिनारायण मंदिराजवळ हा अपघात झाला होता. त्यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. या भागातील अपघातांची संख्या वाढत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या विचारात घेता आणि रविवारी झालेल्या अपघाताची तीव्रता विचारात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते.

या समितीमध्ये राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदस्य, तर प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव यांचा म्हणून समावेश आहे. या समितीने अहवाल तयार केला असून, मंगळवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे.

navale pool accident
Ajit Pawar: ‘मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच’ या विधानावर अजित पवारांची भूमिका स्पष्ट, म्हणाले...

नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघाताबाबत ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी रम्बल स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढविणे, वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवणे आदी उपायोजना करण्यात आल्या आहेत. तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने ‘एनएचएआय’ला सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.