सेट परीक्षा २६ सप्टेंबरला होणार

Set exam
Set exam
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची ‘राज्यस्तरीय पात्रता परीक्षा’ (सेट) २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना येत्या सोमवारपासून (ता.१७) अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव आणि ‘सेट’चे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी (गोवा) या केंद्रावर होणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाइन पद्धतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वत:कडे जतन करून ठेवावी. तसेच त्याची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे पाठवू नये. विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचे शुल्क फक्त क्रेडिट किंवा डेबिड कार्डद्वारे किंवा इंटरनेट बॅंकिंगद्वारे भरायचे आहे. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट, डेबिट कार्ड, इंटरनेट बॅकिंगद्वारे भरल्याचा पुरावा जतन करून ठेवावा.

Set exam
पुण्यातील रिक्षाचालकांची 'जुगाड ऍम्ब्युलन्स' धावतेय मदतीसाठी;पाहा व्हिडिओ

सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या ‘https://setexam.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क भरून सुद्धा विद्यार्थ्यांचे नाव यादीत समाविष्ट नसल्यास अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा ‘set-support@pun.unipune.ac.in’ ई-मेल आयडीवर पाठवायचा आहे. सेट परीक्षेचे माहितीपत्रक आणि अभ्यासक्रम विद्यापीठाच्या ‘https://setexam.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल, तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.

सेट परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://setexam.unipune.ac.in

- अर्ज भरण्यासाठी मुदत :  १७ मे (सकाळी अकरा वाजल्यापासून) ते १० जून (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)

Set exam
पुणेकरांनी अनुभवला संगीत नाटकांचा सुवर्णकाळ

असे असेल परीक्षा शुल्क

प्रवर्ग : प्रक्रिया शुल्क

- खुला  प्रवर्ग : ८०० रुपये

- इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती/विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी)/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि विकलांग प्रवर्ग/ अनुसूचित जा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.