BJP : भाजप तालुकाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तालुका पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे

प्रदेशाध्यक्षांसह जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रभारींकडे केली लेखी तक्रार
भाजप
भाजपटिम ई सकाळ
Updated on

वेल्हे : भारतीय जनता पक्षाचे वेल्हे (राजगड) तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तालुक्यातील भाजपचे एकनिष्ठ पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असून या संदर्भातील लेखी निवेदन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे तर भोर विधानसभा निवडणूक प्रभारी किरण दगडे पाटील यांच्याकडे दिले असल्याची माहिती माजी तालुका अध्यक्ष रवींद्र दसवडकर व किसान मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिनकर मळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत आनंद देशमाने यांच्या फसव्या व पक्षविरोधी कामकाजा संदर्भात वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.

भाजप
Nashik Accident News : दोधेश्‍वर फाट्यानजीक बसचा भीषण अपघात; वृद्ध महिला जखमी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील देशमाने यांनी तालुका कार्यकारणी सदस्य विविध आघाड्या व मोर्चाचे पदाधिकारी, शक्ती प्रमुख ,बूथ प्रमुख ,आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व यांची बैठक घेऊन सर्वांसमवेत निवडणूक प्रचारात उतरणे आवश्यक असताना असे काहीही न करता एकटेच मित्र पक्षांच्या प्रचारात फिरत होते .पक्षाचे झेंडे कोणत्याही साहित्याचा वापर केला गेला नाही स्वतः एकही कार्यकर्ता प्रचारात उतरवला नाही त्यांच्या या कृतीमुळे तालुक्यात पक्षाचे अस्तित्व नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

भाजप
Dhule News : PM, CMपर्यंत तक्रार; पण महापालिका यंत्रणा हलता-हलेना! घरासमोरील तुंबलेल्या गटारप्रश्‍नी प्रा. डॉ. अन्सारींचा संताप

पदाचा गैरवापर करत असून स्वहितासाठी ते काम करत आहे विद्यमान अध्यक्षांनी आजपर्यंत एकही मासिक सभा घेतली नसून भाजपच्या मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवण्यासाठीचे अभियान सुरू केली आहे ते स्वतःच ठेकेदार असून त्यांना आर्थिक लाभ व्हावा अशीच कामे त्यांनी आत्तापर्यंत पक्षाच्या नावावर मंजूर करून आणली असून आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात ते करीत आहेत.

भाजप
Beed News : विजेच्या तीव्र धक्क्यात शेतकऱ्यासह दोन बैल ठार; शेतात कोळपणी करताना दुर्घटना

त्यांच्या फसफेगिरीचा कळस म्हणजे पुण्याचे माजी पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे तालुक्यात आले असता त्यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करून घेतले मात्र दुसऱ्या दिवशी कार्यालय बंद करून टाकले व स्वतःची पब्लिसिटी करून पक्षाची मात्र फसवणूक केली आहे . तालुक्यात भाजपाचे राजकीय विरोधक असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही मोठ्या नेत्यांसोबत आनंद देशमाने यांचे राजकीय व्यावसायिक संबंध आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणे यांच्या विरोधात काम करीत असून पक्षाचे विचार व पक्ष संपवण्याचेच काम तालुक्यामध्ये करीत आहेत.

यासारखे अनेक बोगस प्रकार देशमाने यांच्या माध्यमातून वारंवार घडत असून पक्षाच्या विरोधात काम करीत आहेत इमानदारीने सच्चा कार्यकर्त्यांची खच्चीकरण ते करीत असून याबाबत वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही त्यांच्यावर कोणती कारवाई होत नसल्याने पुढील काही दिवसांमध्येच तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे या प्रसिद्धी पत्रकार वरती माजी अध्यक्ष रवींद्र दसवडकर, किसान मोर्चा जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिनकर मळेकर, पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू रेणुसे ,युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य अविनाश भोसले, युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी शुभम बेलदरे, सचिन भरम ,प्रशांत शिळीमकर, रोहिदास करंजकर, रोहित शिळीमकर ,सुनील बोरगे, राजाराम लिमन यांच्यासह पस्तीस ते चाळीस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सह्या करून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.