Pune : मांजराईनगरचे स्वच्छतागृहच कचऱ्याच्या विळख्यात

येथील मांजराईनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या सुविधेसाठी नदीतिरी असलेले स्वच्छतागृह सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे.
Pune
Pune sakal
Updated on

मांजरी : येथील मांजराईनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या सुविधेसाठी नदीतिरी असलेले स्वच्छतागृह सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. हा कचरा भिजल्यामुळे कुजून त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे तेथे माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या झोपडपट्टीसाठी ग्रामपंचायतने नदीतीरी स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था केली होती. समावेशानंतर पालिकेने कचरा उचलण्यासाठी स्वच्छ संस्थेची नेमणूक केली आहे. मिळकतदारांकडून महिना ठराविक रक्कम घेऊन संस्थेकडून घरटी कचरा संकलन केले जाते. आर्थिक परिस्थितीमुळे झोपडपट्टीतील रहिवासी हा मोबदला देऊ शकत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहालगत मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. हा कचरा उचलण्याची जबाबदारी पालिकेची असतानाही गेली अनेक दिवसापासून हा कचरा येथे साचला आहे.

तो वेळेवर न गेल्याने त्याचे ढीग तयार झाले आहेत. सध्याच्या पावसाने हा कचरा कुजला असून त्याची दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार शिल्पा कुंभार, वैशाली साळवे, कोमल कुंभार, रोहिणी शेंडकर, स्वाती कुंभार, पल्लवी शेंडकर, सविता मुळेकर, जयश्री लोणकर, आरती घुले, रूपाली कुंभार, उमा तिकोणे, माया शिंदे, मनीषा साळवे, अनिता कुंभार, रेणुका रणपिसे यांनी केली आहे.

"माळवाडी, कुंजीर वस्ती, सटवाई नगर, वेताळ वस्ती, राजीव गांधी नगर, ७२ घरकुल, ११६ घरकुल हा झोपडपट्टीचा भाग पालिकेने गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करावा. या भागातील रहिवासी गरीब असल्याने येथील कचरा स्वच्छ संस्थेने मोफत संकलित करून रस्त्यांसह परिसर वेळोवेळी स्वच्छ करावा. आरोग्य विभागाने वेळोवेळी या भागात औषध फवारणी करावी. अन्यथा, सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल.'

राजेंद्र साळवे

अध्यक्ष, अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती

"आज येथील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. तेथे चिखल झाल्याने राहिलेला कचरा दोन दिवसांत जेसीबीच्या साह्याने उचलला जाईल. परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे. स्वच्छ संस्थेवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.'

प्रियंका कटके

आरोग्य अधिकारी, हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.