पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. २०) उद्या निकाल होणार आहे..या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आर्इ शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड येरवडा कारागृहात असून, त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर दोन्ही सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. जामिनाच्या निकालासाठी २० ऑगस्ट दाखल देण्यात आलेली आहे..कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपींनी गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेड़छाड़ करण्याबरोबरच नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाला योग्य तो निर्णय देण्यासाठी कायद्यानुसार पुरावा लागतो. त्यामुळे न्याययंत्रणेशीच केलेला हा खेळ आहे. न्याययंत्रणेशी खेळणे हे अतिशय गंभीरतेने घेतले पाहिजे, असा युक्तिवाद कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलेला आहे. तर बचाव पक्षाच्यावतीने ॲड. हर्षद निंबाळकर, अॅड. सुधीर शहा, अॅड. ऋषीकेश गानू, ॲड. प्रशांत पाटील, अॅड. प्रसाद कुलकर्णी आणि अॅड. सत्यम निंबाळकर हे काम पाहत आहेत..पोर्शे कारच्या सुटकेचा २८ ला निकालअपघातातील कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी येथील बाल न्याय मंडळात (जेजेबी) अर्ज केला आहे. या अर्जावर पोलिसांनी २८ जुलैपर्यंत त्यांचा से सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र अद्याप पोलिसांनी त्यांचे म्हणणे सादर केलेले नाही. या अर्जावर २८ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे पोर्शे कार अग्रवाल कुटुंबीयांना कधी परत मिळणार याबाबत त्याच दिवशी निर्णय होवू शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.