‘एमपीएससी’च्या परीक्षेची प्रतीक्षा संपली

राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारीला होणार; संकेतस्थळावर पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर
MPSC
MPSCMPSC
Updated on

पुणे : विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. मात्र, आता ती संपली आहे. अखेर एमपीएससीने आपल्या संकेतस्थळावर पुढील वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ‘एमपीएससी’ची राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या २ जानेवारी २०२२ ला होणार असून मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे दरम्यान घेण्यात येईल. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रीया राबविण्यात आला नव्हती. तसेच अनेकदा परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यात फार मोठी मदत होणार आहे. ‘‘एमपीएससी’कडून नोव्हेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यामुळे पुढील वर्षातील परीक्षांची जाहिरात कधी येईल. तारखा काय असतील, परीक्षा वेळेवर होतील का?,’’ असा प्रश्‍न निखिल रणसिंग याने केला.

गेल्या २ वर्षांत अनेक परीक्षा झाल्या नाहीत. सध्या मागील वर्षातील परीक्षा होत आहेत. वेळापत्रक जाहीर केल्याने एमपीएससीचे स्वागत आहे. राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. फक्त परीक्षा होऊन उपयोग नाही तर जागांची संख्यादेखील जास्त असावी. याची शासनाने दखल घ्यावी.

- नीलेश निंबाळकर,

विद्यार्थी

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होत नसल्याने अनेक विद्यार्थी चिंतेत होते. पुण्यात राहून अभ्यास करणे तसे महागाईमुळे कठीण होत आहे. परीक्षा समोर असतील तर काही वाटत नाही. दोन वर्षांतील परीक्षा आता सलग होणार असल्याने ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. एमपीएससीचे आणि राज्य शासनाचे आभार.

- किशोर गायकवाड,

विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.