Bhairavnath Mata Jogeshwari Temple
Bhairavnath Mata Jogeshwari Templeesakal

Bhairavnath Temple : भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली; मध्यरात्री परिसरात ड्रोन कॅमेरा फिरला अन्..

Bhairavnath Temple : दानपेटीत अंदाजे ४० ते ५० हजार रुपये असल्याचे पुजारी रामचंद्र गुरव यांनी सांगितले.
Published on
Summary

मागील काही दिवसांपासून ड्रोन कॅमेरे या भागात रात्रीच्यावेळी घिरट्या घालत असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. त्याचा आणि या चोरीच्या घटनेशी काही संबंध आहे का?

निरगुडसर : शिंगवे (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. ही घटना शुक्रवार (ता. १२) मध्यरात्री घडली. या परिसरात ड्रोन फिरल्यानंतर चोरी झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

शिंगवे गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या (Bhairavnath Temple) पूर्वेच्या बाजूकडील खिडकीच्या बाहेरील स्टीलचे ग्रील तोडून, त्यानंतर खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील रक्कम चोरट्यांनी लांबविली. दानपेटीत अंदाजे ४० ते ५० हजार रुपये असल्याचे पुजारी रामचंद्र गुरव यांनी सांगितले.

Bhairavnath Mata Jogeshwari Temple
'मी पायानं अपंग असलो, तरी मराठा आरक्षण मिळणं महत्त्वाचं'; पोलिसांनी गाड्या अडविल्याने अपंगांची 3 किलो मीटरपर्यंत कसरत

आज, शनिवार (ता. १३) पहाटे पाच वाजता रामचंद्र गुरव हे पूजेसाठी मंदिरात आले असता, त्यांना मंदिराची पूर्वेकडील खिडकी उघडी दिसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी दानपेटी पाहिली तर दानपेटीला कुलूपही दिसले नाही. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी तातडीने मंदिराला भेट देऊन पाहणी केली. मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या विविध ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पाहिले. मंदिरातील झालेल्या चोरीच्या तपासकामी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

ड्रोन फिरल्यानंतर नागरिकांत भीतीचे वातावरण

मागील काही दिवसांपासून ड्रोन कॅमेरे या भागात रात्रीच्यावेळी घिरट्या घालत असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. त्याचा आणि या चोरीच्या घटनेशी काही संबंध आहे का? ड्रोन फिरल्यानंतर चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी, वळती, शिंगवे जवळे, भराडी, निरगुडसर, थोरांदळे परिसरात रात्रीच्यावेळी ड्रोन फिरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत, तरी प्रशासनाने या ड्रोनसंबंधी तपास करावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.