Patas Police : बिरोबावाडीत सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल घेऊन फरार

बिरोबावाडी (ता. दौंड) येथे अज्ञात चोरट्यांनी मोठा हात मारल्याचे समोर आले.
Birobawadi Village Patas Police Station
Birobawadi Village Patas Police Stationesakal
Updated on
Summary

रात्री दीडच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरातील मुख्य खोलीचा शिताफिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला.

पाटस : बिरोबावाडी (ता. दौंड) येथे अज्ञात चोरट्यांनी मोठा हात मारल्याचे समोर आले. येथील (Birobawadi) दादा येडे यांच्या घरात चोरट्यांनी रात्री दीडच्या सुमारास प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण ६ लाख ६१ हजारांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.

Birobawadi Village Patas Police Station
Road Accident : देवदर्शन घेऊन परतताना मोटार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; 6 वर्षांच्या बालिकेसह तीन जागीच ठार, चार जण गंभीर जखमी

याबाबत दादा येडे यांनी पाटस पोलिस चौकीत (Patas Police Station) फिर्याद दिली, त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी माहिती दिली. बिरोबावाडी येथे फिर्यादी दादा येडे यांचे राहते घर आहे. मंगळवारी (ता. २१) रात्री घरातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे आप-आपल्या खोलीत झोपले. रात्री दीडच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरातील मुख्य खोलीचा शिताफिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी यांचा मुलगा व सून झोपलेल्या खोलीत प्रवेश केला.

त्यावेळी चोरट्यांनी बाजूच्या कपाटाचा दरवाजा उघडला. त्यामधील साहित्य इतरत्र करुन कपाटातील सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे एकूण दहा तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम घेतली. कोणीतरी पळत असल्याचा आवाज आल्याने घरातील मंडळींना अचानक जाग आली. घरातील व्यक्तींनी आरडा-ओरडा करताच चोरट्यांनी धूम ठोकली व अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.

Birobawadi Village Patas Police Station
Pune Crime : गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी 16 आरोपींविरुद्ध 2000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

यावेळी कपाटात पाहिले असता, त्यामधील दहा तोळे सोने व रोख रक्कमेसह एकूण ६ लाख ६१ हजारांची चोरी झाल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच पाटस पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. तसेच घटनास्थळी ठसे तज्ञ पथक पाचारण करण्यात आले. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. चोरीच्या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली गेली. दरम्यान,नागरिकांनी सुरक्षतेच्या दृष्टीने सावध व सतर्क राहण्याचे आवाहन तपासी अधिकारी फौजदार शेख यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.