Pune Crime : सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरातून मूर्तींची चोरी

सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून चोरट्यांनी मूर्ती आणि चांदीची मखर चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
temple idol theft
temple idol theftSakal
Updated on

Pune News: सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून चोरट्यांनी मूर्ती आणि चांदीची मखर चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय ३८, रा. खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौक परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.

दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी मध्यरात्री मंदिराच्या मुख्य दरवाजासह कपाटाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कपाटातील पितळेच्या मूर्ती आणि चांदीची मखर असा सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.