पुणे - खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करून सराफी दुकानातून दागिने चोरणाऱ्या तरुणीसह साथीदाराला लष्कर पोलिसांनी अटक केली. या दोघांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, सातारा आणि सिंधूदुर्गमधील सराफा दुकानात चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे..शेखर हेमराज वाणी (वय ३२, रा. मांजरी, हडपसर) आणि शिवानी दिलीप साळुंखे (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अकलूज. जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लष्कर भागातील एका सराफा दुकानात ३१ ऑक्टोबर रोजी तरुणीने दागिने चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला..पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात तरुणीसह साथीदाराने हातचलाखीने सराफा दुकानातून ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ते दोघेजण दुचाकीवरून मुंढव्याच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी शोध घेऊन दोघांना अटक केली. त्या दोघांनी पिंपरी-चिंचवड, सिंहगड रस्ता परिसरासह नऊ ठिकाणी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे..परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि सहाय्यक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार, सहाय्यक निरीक्षक विशाल दांडगे, पोलिस अंमलदार महेश कदम, संदीप उर्किडे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, अल्का ब्राम्हणे आदींनी ही कारवाई केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.