वालचंदनगर - रुई (ता. इंदापूर) येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या सोने-चांदीच्या दागिन्यासह ३ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याप्रकरणी अमोल बापुराव मारकड वय (२६, रा.रुई) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मारकड यांचे रुई गावामध्ये हॉटेल व्यवसाय आहे. आज गुरुवार (ता. १७) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मारकड हे सकाळी सहा वाजता वडिल बापुराव व भाऊ अविनाश यांच्यासह हॉटेल सुरु करण्यासाठी गेले होते.
दुपारी १२ च्या सुमारा अमोलची पत्नी सुप्रिया व भावजय प्रियंका घरातील मुलांना घराला कुलूप लावून भावकीतील लग्नाला गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरावरती नजर ठेवून घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याची अंगठी, चैन, बदाम, कानातील फुले, सोन्याचे घंटन, बोरमाळ असे सव्वा पाच तोळे सोन्याचे, चांदीच्या पट्या व दाेन हजार रुपये असा ३ लाख ६३ हजार ८० रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच अमोल यांच्या घराशेजारील सर्जेराव सुखदेव मारकड यांच्या घराचे कुलूप तोडले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.