मुंबई, पुणे या महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याबाबत मोठं विधान केलं आहे. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पण पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. (then Pune to be ruined Raj Thackeray serious warning)
राज ठाकरे म्हणाले, "सन १९९५च्या आगोदरचा महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र यावर लेख लिहावासा वाटतो. ९५ पूर्वी महाराष्ट्रात काही नव्हतं शांतता होती. पुण्यातील लोकांनी हे काढून पहावं. एका पुण्याचं आता चार-चार पुण्यात रुपांतर झालंय. मी पूर्वी पुण्याला यायचो तेव्हा आमचे मित्र म्हणायचे नदी पलिकडचं पुणं ना. एवढीच त्यावेळी पुण्याची परिभाषा होती. पण आता हिंजवडी काय, मगरपट्टा काय! कुठल्या कुठे पसरलंय पुणं. मी अनेकदा माझ्या भाषणांमधून सांगत आलोय. की मुंबई बरबाद व्यायला काही काळ गेला पुणं बरबाद व्हायला वेळ नाही लागणार"
बदलाच्या वेगात आपण असं शिरलो की त्याला बरोबर घेऊन पुढे आलो. त्या वेगानं आपल्याला आजवर पुढे आणलं आहे. त्या वेगामुळं चित्रपट बदलले, नाटक, साहित्य, राजकारण बदललं. बदल हा गरजेचा असतो हे मान्य आहे पण तो आपल्या जीवावर उठणार असेल तर त्याचं काय करायचं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
95 नंतर सगळं बदलत गेलं. कारण यापूर्वी सगळ्या चळवळी, सर्व राजकीय पक्ष हे सगळं उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात होतं. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तो दुआ होता. ९५ नंतर यांची मुलं परदेशात जायला लागली त्यानंतर ते राजकारणापासून बाजूला झाले. त्या राजकारणाला खूप मोठा वर्ग ज्याची राजकारणाला गरज आहे तो राजकारणाला तुच्छ मानायला लागला. हा बदलही आपल्या जीवावर उठल आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बदलावर भाष्य केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.