पुणे - ‘तिसरी महासत्ता होण्यासाठी देश विकसित होणे गरजेचे आहे आणि देशाला विकसित करण्यासाठी व्यक्ती व समाजाच्या विकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सीए सुरेश प्रभू यांनी केले..कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी (ता. १७) आयोजित कार्यक्रमात ‘नवीन राष्ट्रीय सहकार धोरण निश्चितीचे पैलू’ या विषयावर प्रभू बोलत होते. ते म्हणाले, ‘देश विकसित करण्यासाठी देशाची संपूर्ण क्षमता आपण वापरली पाहिजे.व्यक्ती आणि समाजाचा विकास होणे आवश्यक असून, हे सहकारामुळेच साध्य होऊ शकेल. कायमस्वरूपी वाढत राहील अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतकरी, कामगार, महिला, युवक, नवउद्योजक यांना बळ मिळाले पाहिजे. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करताना या बाबींचा बारकाईने विचार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.’.कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले की, ‘सहकार क्षेत्रापुढील आव्हाने वाढली आहेत. उत्तम उत्पादने व उत्तम सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान व आर्थिक पाठबळ यांची गरज आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकार योग्य धोरण आखत असल्यामुळे सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे.’.महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘सहकार धोरण यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकाच हेतूने काम करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते निर्माण केल्यामुळे सहकाराला बळ आले आहे. सहकाराला सामान्य माणसाची समृद्धी अपेक्षित आहे.’प्रारंभी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटच्या (व्हॅम्निकॉमच्या) संचालिका डॉ. हेमा यादव, अंब्रेला ऑर्गनायझेशनचे प्रभात चतुर्वेदी यांनी मनोगत व्यक्त केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.