MP Supriya Sule : राज्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करत अशी घटना पुन्हा राज्यात घडू नये म्हणून राज्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे.
MP Supriya Sule
MP Supriya Sulesakal
Updated on

वेल्हे, (पुणे) - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करत अशी घटना पुन्हा राज्यात घडू नये म्हणून राज्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राजगड तालुक्यात सोमवार (ता.९) रोजी गुंजवणी प्रकल्पांतर्गत कानंद- घेव्हंडे- घिसर येथे उंच काठ रस्ता करणे व राजगड तालुक्यातील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे यासाठी मंजूर झालेल्या २८ कोटी ३४लाख २४ हजार रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.